कॉंग्रेसच्या काळात एक कोटींचे कंत्राट मिळाले : अनिल अंबानी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी रुपयांचा फायदा करून दिला, असा आरोप सातत्याने करणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर रिलायन्सने जोरदार पलटवार केला. संपुआ सरकारच्या काळात रिलायन्सला एक लाख कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते, असा गौप्यस्फोट या कंपनीने रविवारी केला आहे.

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीतराहुल गांधी यांनी अनिल अंबानी यांनासंधिसाधू भांडवलदार’ असे संबोधताना अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यासारख्या भांडवलदारांना मी कधीच प्रामाणिकतेच्या यादीत ठेवणार नाही, असे सांगितले होते. राहुल गांधी यांच्या आरोपावर पलटवार करताना कंपनीने जारी एका निवेदनात म्हटले आहे की, “राहुल यांनी संधिसाधू भांडवलदार आणि अप्रामाणिक व्यावसायिक म्हणून आमच्या कंपनीचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना संबोधित केले आहे. राहुल गांधी किती खोटे बोलत आहेत, हे यावरून दिसून येते."

"सत्यता अशी आहे की, याच कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या दहा वर्षांच्या काळात, ऊर्जा, दूरसंचार, रस्ते, मेट्रो यासारख्या पायाभूत क्षेत्रांसाठी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला एक लाख कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. अनिल अंबानी आणि त्यांची रिलायन्स कंपनी त्यावेळी याच कॉंग्रेसच्या दृष्टीने प्रामाणिक होती आणि आता ती अप्रामाणिक कशी ठरली? संरक्षण खरेदी व्यवहारात कॉंग्रेस नेत्यांना दलाली न मिळाल्याने राहुल गांधी त्रस्त झाले आणि यातूनच त्यांनी राफेलव्यवहारप्रकरणी अनिल अंबांनी यांच्यावर खोटे आणि निराधार आरोप केले आहेत. राफेल व्यवहारात केंद्र सरकारने किंवा पंतप्रधान मोदी यांनी आमच्या कंपनीची निवड केली नसून, फ्रान्सच्या दसाँ कंपनीचा तो निर्णय होता. हा संपूर्ण व्यवहार कायद्याच्या चौकटीत झाला होता,” असा खुलासाही कंपनीने निवेदनात केला आहे.

'

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@