इमर्जन्सी लॅंडिंग दरम्यान विमानाला आग : ४१ प्रवाशांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2019
Total Views |
 



मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्को येथील एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करताना विमानाने पेट घेतला. या दुर्घटनेत ४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मॉस्कोच्या शीरीमीमेटयेवो या विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाच्या मागील बाजूने अचानक पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. एअरोफ्लोट एअरलाइन्स या कंपनीच्या विमानाला झालेल्य़ा या अपघातात ४१ जणांचा मृत्यू झाला तर ३७ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. याविरोधात रशियामध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. 





 

मॉस्कोहून या विमानाने रशियाच्या म्युरमॅनस्क शहरासाठी उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर बिघाड झाल्यामुळे लगेचच हे विमान पुन्हा विमानतळाच्या दिशेने फिरले. ७३ प्रवाशांसह ५ क्रू मेंबर या विमानामध्ये होते. ७८ पैकी ३७ प्रवासी या भीषण दुर्घटनेतून बचावले, अशी माहिती रशियाच्या तपास समितीच्या प्रवक्त्याने दिली आहे. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत अजून माहिती उघड झालेली नाही. वैमानिकाने हवाई सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले का ?, त्यादृष्टीने आता तपास सुरू आहे.




 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@