ह्यो "माझा" शिवाजी हाय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2019
Total Views |



नाटक : 'ह्यो माझा शिवाजी हाय'

लेखक दिग्दर्शक - समीर खांडेकर

प्रकाशयोजना - श्याम चव्हाण

संगीत आणि गायन - मंदार पिळवलकर, कुशल म्हात्रे

नेपथ्य- सुमित पाटील

नाट्यनिर्माते - हितेश सांदणे, संतोष महाडिक

सध्याच्या स्पर्धात्मक युगात एखाद्या कुटुंबामधील मुलाला किंवा मुलीला शाळेत घालायची वेळ जवळ अली की सऱ्हास कुटुबांमधील मोठ्या लोकांमध्ये आपल्या पाल्यासाठी मराठी माध्यमात प्रवेश घ्यायचा की इंग्रजी माध्यमामध्ये याविषयी वाद-विवाद होताना दिसतात. आता या प्रायोगिक नाटकाचं नाव 'ह्यो माझा शिवाजी हाय' असं आहे त्यामुळे तुम्हाला वाटेल की मग यामध्ये भाषेचा काय संबंध आहे. पण हो, हे नाटक मुख्यत्वे महाराजांच्या आयुष्याशी निगडित नसून प्रमाण आणि ग्रामीण भाषावादावर आधारित आहे. हे नाटक हलकं-फुलकं वाटलं तरी यामध्ये बराच आशय दडलेला आहे.



एका गावाकडच्या मुलाला म्हणजेच नाटकातील किरणला शिवाजी महाराजांची भूमिका करायची आहे. प्रत्येकालाच आयुष्यात आपल्याला मान मिळावा, आपण प्रसिद्ध व्हावं अशी इच्छा असते. तशीच किरणची देखील आहे. पण त्यासाठी त्याला प्रचंड संघर्ष करायला लागतोय. अगदी त्याच्या घरचे, त्याची मित्र मंडळी सर्वच त्याच्या या निर्णयाविरुद्ध आहेत. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराजांची भूमिका करण्यात असं काय वावगं आहे. पण किरणच्या बाबतीत ते का अवघड आहे हे तुम्हाला नाटक पाहिल्यावरच कळेल. 'आपल्या अस्तित्वापेक्षा भाषा मोठी नसते...माणूस अस्तित्वात आहे म्हणूनच भाषा आहे' हा उत्तम संदेश या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. प्रमाण भाषा खरंच महत्वाची आहे का, हा विचार करायला हे नाटक तुम्हाला भाग पाडेल.




महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचं नाव सुवर्णाक्षरात कोरलेलं आहे. हर हर...महादेव असं म्हंटलं की त्यानंतर आपसूकच शिवाजी महाराज की जय अशी घोषणा सगळ्यांच्याच तोंडून बाहेर येईल. शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहेत, पण ते सुद्धा एक माणूसच होते याचा कधी विचार केलाय तुम्ही? महाराजांची प्रतिमा ही प्रत्येकासाठी वेगवेगळी आहे त्यामुळे हे नाटक पाहिल्यानंतर ह्यो "माझा" शिवाजी हाय यामधील माझ्या दृष्टिकोनातून महाराज कसे असतील याची कल्पना आपल्याला करता येईल. त्यामुळे प्रत्येकवेळी हातात तलवार, रेखीव आणि तेजस्वी चेहरा, धारदार नाक, अंगरखा आणि जिरेटोप असं असेल तरच ते महाराज असं म्हणणं कितपत योग्य आहे या संभ्रमात तुम्ही पडाल हे नक्की. त्यामुळे एवढंच सांगावंसं वाटतं की एक व्यापक विचाराने ही कलाकृती बघायला तुम्ही गेलात तर एक वेगळाच आशय तुमच्यासमोर येईल.

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@