रंपाटचा ट्रेलर एकदम रंपाट...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2019
Total Views |



दिग्दर्शक रवी जाधव यांचा रंपाट हा चित्रपट प्रदर्शनाच्या शेवटच्या टप्प्यात असताना आज त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनय बेर्डे म्हणजेच मिथुन सोलापूरहून आणि कश्मिरा परदेशी म्हणजेच मुन्नी कोल्हापूरहून काही ना काही धडपड करत आणि त्यांचे सुपरस्टार बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आले आहेत. या प्रवासात त्या दोघांबरोबर कुशल बद्रिके
, प्रिया बेर्डे, अभिजित चव्हाण हे सगळे त्यांना साथ देणार आहेत असे दिसून येत आहे. पहिल्यांदाच आई आणि मुलगा एकत्र काम करत असल्यामुळे ती देखील उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहेच.

 
 
 

या चित्रपटाची पटकथा, कथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित आणि स्वतः रवी जाधव यांनी लिहिले आहेत. गुरु ठाकूर आणि मंगेश कांगणे यांनी लिहिलेली चित्रपटातील गाणी खूपच रंपाट असून या गाण्यांना चिनार आणि महेश यांनी संगीत दिले आहे. या गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे. असा हा रंपाट चित्रपट येत्या १७ मे ला महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@