संघ आणि राजकारण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2019
Total Views |



लोकशाही व्यवस्थेत एकाहून अधिक राजकीय पक्ष असणे स्वाभाविकच आहे. संघ संपूर्ण समाजाचे संघटन असण्याच्या नात्याने हेही स्वाभाविकच आहे की, समाजातील कुठलेही क्षेत्र संघापासून अस्पर्शित राहणार नाही आणि स्वयंसेवक समाज जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपली राष्ट्रीय दृष्टी घेऊन जातील. अशा स्थितीत, काही स्वयंसेवक राजकारणात सक्रिय आहेत म्हणून संघ राजकारण करतो, तो एक राजकीय पक्ष आहे, हे म्हणणे अनुचित व चूक आहे. राजकीय पक्ष समाजाच्या केवळ एका भागाचे प्रतिनिधीत्व करतात आणि समाजाचा दुसराही एक भाग असतोच. संघ जर संपूर्ण समाजाचे संघटन आहे, तर हा ‘संपूर्ण’ कोण्या एका ‘भागा’चा भाग कसा काय बनू शकतो?


आपल्या स्थापनेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वत:ला संपूर्ण समाजाचे संघटन मानत आणि सांगत आला आहे. स्वातंत्र्यानंतरही संघाच्या या भूमिकेत काही फरक पडला नाही. म्हणून स्वातंत्र्यानंतर लगेचच १९४९ साली संघाची जी घटना तयार झाली त्यातही हे स्पष्ट नमूद आहे की, जर एखादा स्वयंसेवक राजकारणात सक्रिय होऊ इच्छित असेल, तर तो कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य होऊ शकतो. ही घटना भारतीय जनसंघाची स्थापना होण्याआधी तयार झाली आहे. जनसंघाच्या स्थापनेनंतरही त्यात अनेक स्वयंसेवक आणि प्रचारक जाऊनही यात कुठलाही बदल झालेला नाही. लोकशाही व्यवस्थेत एकाहून अधिक राजकीय पक्ष असणे स्वाभाविकच आहे. संघ संपूर्ण समाजाचे संघटन असण्याच्या नात्याने हेही स्वाभाविकच आहे की, समाजातील कुठलेही क्षेत्र संघापासून अस्पर्शित राहणार नाही आणि स्वयंसेवक समाज जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपली राष्ट्रीय दृष्टी घेऊन जातील. अशा स्थितीत, काही स्वयंसेवक राजकारणात सक्रिय आहेत म्हणून संघ राजकारण करतो, तो एक राजकीय पक्ष आहे, हे म्हणणे अनुचित व चूक आहे. राजकीय पक्ष समाजाच्या केवळ एका भागाचे प्रतिनिधीत्व करतात आणि समाजाचा दुसराही एक भाग असतोच. संघ जर संपूर्ण समाजाचे संघटन आहे, तर हा ‘संपूर्ण’ कोण्या एका ‘भागा’चा भाग कसा काय बनू शकतो? (Party stands for a part and there is bound to be a counterpart. Sangh stands for the entire society. Conceptually RSS and Hindu society are co-terminus and psychologically they are one. Then how can the 'Whole' be a party to a part?) संघस्थापनेनंतर (१९२५), १९३० साली ‘सविनय कायदेभंगा’च्या आंदोलनात भाग घेतेवेळी डॉ. हेडगेवार, इतर स्वयंसेवक तसेच सहकाऱ्यांसह सत्याग्रहासाठी जाण्याआधी सरसंघचालकपदाची आपली जबाबदारी आपले एक सहकारी डॉक्टर परांजपे यांच्याकडे सोपवून वैयक्तिकपणे सत्याग्रहात सहभागी झाले होते आणि त्यासाठी त्यांना एका वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षाही झाली होती.

 

स्वातंत्र्यानंतर गृहमंत्री सरदार पटेल यांच्याकडून संघाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव आल्यावर श्री गुरुजी यांनी तो स्वीकारला नाही. कारण, संघ एक राजकीय पक्ष नाही, तर संपूर्ण समाजाचे संघटन करू इच्छित होता. राजकारणात एका राष्ट्रीय विचाराच्या पक्षाची आवश्यकता लक्षात घेऊन, संघाने ही कमतरता पूर्ण केली पाहिजे, असा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा प्रस्ताव आल्यावर श्री गुरुजी यांनी त्यांना स्पष्ट म्हटले की, हे काम तुम्ही करा. संघ तुम्हाला मदत करेल. परंतु, संघ आपले संपूर्ण समाजाचे संघटन करण्याचे कामच करीत राहील. आणीबाणीत १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर, जनता पक्षाचे सरकार बनविण्यात संघ स्वयंसेवकांचे महत्त्वाचे योगदान होते. अनेक पक्षांना घेऊन बनलेल्या जनता पक्षात अर्थात, सत्तेत सहभागी होण्याचा आकर्षक प्रस्ताव आल्यानंतरही तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी या प्रस्तावाला न स्वीकारता म्हटले की, विशिष्ट परिस्थितीत संघ या निवडणुकीत सहभागी झाला होता. आता संघ आपल्या नियत कार्यात म्हणजेच संपूर्ण समाजाच्या संघटनेच्या कार्यातच राहील. हे सर्व समजून घेण्यासाठी, समाजातील संघटन नाही, तर संपूर्ण समाजालाच संघटित करण्याच्या संघाच्या विचारामागील भूमिका समजून घेणे गरजेचे आहे. संघाच्या २०१८च्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत, ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य, संघाच्या सरकार्यवाहांच्या निमंत्रणावरून आले होते. त्या दिवशी त्यांचा ९५वा जन्मदिवस होता. ते वयाच्या आठव्या वर्षी (१९३१ साली) संघाचे स्वयंसेवक झाले. तेव्हापासून सतत सक्रिय होते. त्यानिमित्त पूजनीय सरसंघचालकांच्या हस्ते त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मा. गो. वैद्य म्हणाले, “संघाला समजणे सोपे नाही. पश्चिमेकडील द्वंद्वात्मक (Binary) विचारांनी संघाला समजणे शक्य नाही. भारतीय विचाराच्या एकात्म दृष्टीनेच तुम्ही संघाला समजून घेऊ शकता.” ईशावास्य उपनिषदाच्या पाचव्या मंत्रात आत्मतत्त्वाचे वर्णन करताना उपनिषदकार म्हणतात-

 

तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्तिके।

तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यत:॥ 

(ते आत्मतत्त्व चल आहे आणि अचलही आहे. ते दूर आहे आणि नजीकही आहे. ते सर्वांच्या आत आहे आणि तेच सर्वांच्या बाहेरही आहे.)

 

ही बाब परस्परविरोधी वाटत असली तरी, सत्य आहे. काहीशी अशीच बाब संघालादेखील लागू होते. संघ संपूर्ण समाजाचे संघटन आहे आणि समाजाचे स्वरूप व्यामिश्र असते. समाजाचे सांस्कृतिक, कामगार, विद्यार्थी, शिक्षण, सेवा, राजकारण, धार्मिक असे भिन्नभिन्न क्षेत्र असू असतात. संपूर्ण समाजाच्या संघटनेत हे सर्व पैलू येणारच. परंतु, संघ कुठल्या एक अंगाचे किंवा क्षेत्राचे संघटन नाही. संपूर्ण समाजाचे संघटन आहे. स्वयंसेवक सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण, राजकारण, सेवा इ. सर्व क्षेत्रात सक्रिय असतानाही संघ यापैकी केवळ कुठलेही एक संघटन नाही. संघ याउपरही काही आहे. तो संपूर्ण समाजाचे संघटन आहे. जसे, पुरुषसूक्तात वर्णन आहे की, तो पृथ्वीसहित संपूर्ण विश्वाला व्याप्त असूनही दहा बोटे शेष राहतो. (स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशान्गुलम्।) याला असेही समजून घेता येईल की, अणुवैज्ञानिकांनी एकेवेळी म्हटले होते की, अणू अविभाज्य आहे. नंतर त्यांनी म्हटले की, अणू विभाज्य आहे आणि त्याचे मुख्यत: तीन कण (Particles) असतात. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग म्हणू लागले की, तीनच नाही, याहूनही अधिक सूक्ष्म कण असतात. मग म्हणू लागले की, ते कण नाहीत, ते तरंगसदृश (waves) गुणधर्म दाखवितात. मग पुढे आणखी संशोधन झाले तर म्हणू लागले की, ते दोन्ही-कण व तरंगही असतात. नंतर हेसनबर्ग यांनी म्हटले की, ते कण आहेत की तरंग हे अनिश्चितच आहे. खरेतर, ते कधीही काहीही असू शकतात. याला ‘हेसनबर्गचा अनिश्चिततेचा सिद्धान्त’ (Heisenberg's uncertainty principle) या नावाने ओळखले जाते. हेच तत्त्व ईशावास्य उपनिषदही प्रतिपादन करते. हे समजून घेतले, तर भारतीय चिंतनाच्या एकात्म दृष्टीला द्वंद्वात्मक नाही, (Integral approach and not Bianary approach) तुम्ही समजू शकाल आणि तरच संघाच्या खऱ्या स्वरूपाला तुम्ही समजू शकाल, असे त्यांनी (मा. गो. वैद्य) म्हटले. म्हणून संघ संपूर्ण समाजाचे संघटन असल्याकारणाने आणि राजकीय क्षेत्र समाजाचे एक महत्त्वाचे अंग असल्याकारणाने, त्या क्षेत्रात स्वयंसेवकदेखील सक्रिय असतील. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असल्यामुळे, अधिकाधिक मतदान व्हावे आणि स्थानिक मुद्द्यांच्या किंवा छोट्या विषयांच्या वर उठून राष्ट्रीय दृष्टिकोनातून समुचित विचार करून राष्ट्रहितास्तव लोकांनी मतदान करावे, असे जनजागरणदेखील एक जागृत नागरिक म्हणून स्वयंसेवक करतील. संघाची घटना कोणाही स्वयंसेवकाला (संघाचे पदाधिकारी नाही) कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा उमेदवाराचा प्रचार करण्यापासून रोखत नाही. परंतु, ९० टक्के स्वयंसेवक कुठल्याही पक्षाचा किंवा उमेदवाराचा प्रचार न करता, राष्ट्रीय मुद्द्यांवरच जागरण करताना दिसतील. असे असतानाही, संघ एक राजकीय पक्ष अथवा राजकीय पक्षाचा भाग बनलेला किंवा बनत नाही. तो संपूर्ण समाजाचे संघटनच आहे. हे भारतीय चिंतनाच्या एकात्म दृष्टीला आणि ईशावास्य उपनिषदाच्या दृष्टीला समजून घेतले तरच लक्षात येऊ शकते.

 

- डॉ. मनमोहन वैद्य

(लेखक रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह आहेत.)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@