थोर समाजसेवक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2019
Total Views |




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज २९४वी जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. अहिल्याबाईंचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड मधील चौंडी गावात झाला. होळकर घराची सून झाल्यानंतर त्यांनी आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले. राजाने प्रजासेवा हीच देवपूजा मानावी या उदात्त विचारांनी त्यांनी आपल्या प्रजेवर राज्य करत राज्याचा व प्रजेचा विकास केला. त्यांच्या कार्यकाळातील प्रशासन व्यवस्थेत प्रजेची उन्नती व विकास, सामाजिक शांतता, सुव्यवस्था, समता व ममत्व, न्याय, स्वातंत्र्य या मानवी मूल्यांवर त्यांनी काम केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अहिल्याबाईंच्या काही महत्वाच्या कामकाजावर एक नजर...

 

१) श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या आग्रहावरून सती जाण्यापेक्षा अहिल्यादेवींनी जनहित महत्त्वाचे मानले. अहिल्यादेवी म्हणत ‘‘सती जाणे कोणत्या शास्त्रात नाही आणि सती गेल्याने कोणताही मोक्ष किंवा पुण्य मिळत नाही. अशा परंपरेची पद्धत बंद केली पाहिजे.’’ सती प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

 

२) अहिल्यादेवींनी आपल्या होळकर शाहीत दत्तक वारसा मंजू्र करून लोकांच्या संसारात सुखाची लाट निर्माण केली. त्यांच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. याशिवाय त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली.

 

३) अहिल्यादेवींनी आपल्या राज्यातील लोकांना जाती किंवा धर्माच्या नावाखाली अस्पृश्यता पाळण्यावर बंदी घातली आणि सर्वांना समान शिकवण दिली. आपल्या स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वतःच्या घरापासून त्यांनी सुधारणेची सुरूवात केली.

 

४) अहिल्यादेवींनी जंगलतोडीविरुद्ध कुऱ्हाडबंदी आणली. प्रत्येक घरातील माणसाच्या नावावर पाच झाडे असे गणित देऊन झाडे लावून घेतली. जे झाडे लावत नाहीत त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा आदेश काढला होता.

 

५) अहिल्यादेवींनी त्याकाळी हुंडाविरोधी कायदा करून हुंडा देणाऱ्या घेणाऱ्या व मध्यस्ती करणाऱ्यांवर दंड ठोठावला.

 

६) इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्यादेवींनीच केलेले फार मोठे काम होते.

 

७) भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवींनी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला.

 

८) काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी इत्यादी ठिकाणी त्यांनी बांधकाम केली.

 

९) महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्यादेवींनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@