लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी संतोष गंगवार यांची निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : १७ व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी संतोष कुमार गंगवार यांची निवड करण्यात आली आहे. गंगवार हे उत्तर प्रदेशमधील बरेली लोकसभा मतदारसंघातून आठव्यांदा निवडून आले आहेत. लोकसभेतील नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणे आणि त्यांचे स्वागत करणे हे त्यांचे काम असणार आहे. २०१४च्या मोदी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पहिले आहे.

 

लोकसभेमधील ज्येष्ठ सदस्याला हंगामी अध्यक्षाचा मान दिला जातो. यंदा हंगामी अध्यक्षपदासाठी मनेका गांधी आणि संतोष गंगवार या दोन नावांची चर्चा होती. यात गंगवार यांनी बाजी मारली. त्यामुळे आता मेनका गांधी यांचा मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

 

१९८९ साली गंगवार यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवत दिल्ली गाठली होती. त्यानंतर १९८९ ते २००४ सालापर्यंत ते सलग सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. २००९ साली मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर २०१४ च्या मोदी लाटेत ते पुन्हा निवडणून येत त्यांनी राज्यमंत्री पदाची शपत घेतली होती. तर यंदाच्या मोदी त्सुनामीत त्यांनी समाजवादी पार्टीच्या भगवत शरण गंगवार यांचा १ लाख ६७ हजार २८२ मतांनी पराभव पुन्हा एकदा दिल्ली गाठली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@