ओडिशाचे मोदी- प्रतापचंद्र सारंगी यांनी घेतली शपथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2019
Total Views |

ज्यांची भेट झाल्याविना मोदींचा दौरा पूर्ण होत नाही


नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर ओडिशातील बालेश्वर लोकसभा मतदार संघातून विजयी झालेले खासदार प्रताप चंद्र सारंगी यांच्या कार्यशैली आणि समाजसेवेच्या व्रतामुळे त्यांची ओडिशाचे मोदी अशी ख्याती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. संपूर्ण समाजाला आपले कुटूंब मानणाऱ्या प्रताप सारंगी यांनी आपले आयुष्य समाजाला अर्पण केले आहे.



 


आईच्या निधनानंतर त्यांच्या राहत्या घरात ते एकटेच राहतात. बालेश्वर जिल्ह्यातील निलगीरी या गावातील घरासमोर असलेल्या कुपनलिकेद्वारे पाणी भरण्यापासून ते घरातील सर्व कामे एका सर्वसामान्य माणसाप्रमाणे स्वतःच करतात. सकाळी स्नानानंतर पूजा-अर्चा झाल्यावर आपला संपूर्ण दिवस समाजसेवेत व्यस्त राहतात. त्यांच्या या कार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रभावित आहेत. मोदी जेव्हा जेव्हा ओडिशाला येतात तेव्हा त्यांची भेट अवश्य घेतात. जर भेट झाली नाही तर त्यांची विचारपूसही करतात. समाजसेवा करायची असेल तर राजकारणात उतरावे लागते, या विचारांनी ते राजकारणात आले. २००४ ते २००९ या काळात ते आमदार झाले.





 

ओडिशातील निलगिरी या गावात तुम्ही जाल तर सफेद दाढी, सफेद कुर्ता, सायकल एक पिशवी, असा पेहेराव असलेला माणूस अशी अत्यंत साधी राहणी असलेला हा माणूस. मात्र, जेव्हा एखाद्या गरजवंताला मदत हवी असेल तो थेट सारंगी यांच्या झोपडीजवळ पोहचतो. कारण त्याचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी हीच एकमेव जागा त्याला दिसते. साधी राहणी, इतक्या मोठ्या पदाचा कसलाही बडेजाव नाही, अशा या समाजसेवकाचा स्वभाव लोकांना भावला. यंदाच्या लोकसभा निवडणूकांमध्ये बीजू जनता दलाच्या रविंद्र कुमार जेना यांना १२ हजार ९५६ मतांनी सारंगी यांच्यापुढे पराभव पत्करावा लागला. मतदारांनी त्यांना देशाच्या संसदेत पाठवले.




 

एका ओडिशातील गरीब कुटूंबात जन्मलेले प्रताप सारंगी सुरुवातीपासूनच संसाराच्या मोहजाळापासून अलिप्त राहीले. सडपातळ बांधा श्वेतवस्त्रधारी असा पेहराव ते करत. त्यांचा ओढा कायम अध्यात्माकडे राहीला. ते साधू बनू इच्छित होते. निलगिरी फकिर मोहन महाविद्यालय येथून पदवी मिळवल्यावर त्यांनी रामकृष्ण मठाकडे प्रस्थान केले. येथे सेवा सुरू केल्यावर त्यांनी गृहस्थाश्रमाकडे पाठ फिरवली. आपले आयुष्य समाजाला वाहून घेतले. त्यांच्या आईच्या निधनानंतर ते घरात एकटेच... समाजसेवेची प्रेरणा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाल्याचे ते मानतात. छोट्या सायकलवरून प्रवास करतात... लहानश्या झोपडीत राहून लोकांसाठी काम करतात.


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@