मास्टर ब्लास्टर दिसणार 'या' भूमिकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2019
Total Views |



मुंबई : क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहे. आयसीसी विश्वचषक २०१९ इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत सचिन पहिल्यांदा समालोचकाची भूमिका साकारणार आहे. 'सचिन ओपन्स अगेन' अशा नावाच्या सेगमेंटमध्ये सचिन दिसणार आहे. हा सेगमेंट दुपारी १.५० वाजता होणार असून तो हिंदी आणि इंग्रजीमध्ये असेल. या शोमध्ये सचिनसोबत अन्य विश्लेषकही असणार आहेत.

 

सचिनला पुन्हा एकदा क्रिकेटशी संबंधित पाहून त्याचे जगभरातील चाहते खुश झाले आहेत. विश्वचषक आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे खूप जुने नाते आहे. त्याच्या नावावर विश्वचषक स्पर्धेत आजवर सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम आहे. सचिनने १९९२ ते २०११ अशा ६ विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने खेळलेल्या ४४ सामन्यांमध्ये २,२७८ धावा केल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेतील १५२ धावा ही सचिनची सर्वोच्च खेळी आहे. या खेळीत त्याने ६ शतके आणि १५ अर्धशतके ठोकली आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@