जगमोहन रेड्डींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2019
Total Views |



 


हैदराबाद : वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल ई एस एल नरसिम्हन यांनी त्यांना ही शपथ दिली. विजयवाडाच्या आयजीएमसी स्टेडिअममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी जगनमोहन रेड्डी हे आपले वडील दिवंगत वायएसआर रेड्डी त्यांच्या आठवणीने भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यांच्या पक्षाने १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला. तसेच लोकसभेसाठी २५ पैकी २२ जागांवर त्यांचे खासदार निवडून आले आहेत. आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर जगनमोहन रेड्डी हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. या सोहळ्यात जगमोहन रेड्डींनी एकट्यानेच शपथ घेतली असून त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ७ जून रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

या शपथविधी सोहळ्यासाठी डीएमके अध्यक्ष एमके स्टॅलिन उपस्थित होते. तसेच तेलंगनाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनीदेखील या सोहळ्याला हजेरी लावली होती. याशिवाय अन्य प्रमुख पक्षांच्या नेतेमंडळींनी देखील यावेळी उपस्थिती लावली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat


@@AUTHORINFO_V1@@