विश्वचषकाचे रणसंग्राम आजपासून सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : गुरुवारपासून विश्वचषकाच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट प्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला आहे. यावेळचा विश्वचषक हा वेगळा असणार आहे. यंदा एकूण १० संघ एकमेकांविरोधात लढणार आहेत. सर्वच संघ तगडे असल्यामुळे यंदा कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यावेळी ‘राऊंड रॉबिन’ पद्धतीने विश्वचषक खेळवला जाणार आहे. यापूर्वी १९९२ साली या पद्धतीने विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला इतर ९ संघांशी लढताना येणार आहे. यावेळी विश्वचषकाचे स्वरूप हे खेळाडूंचा चांगलाच कस लागणार आहेत.

 

काय आहे ‘राऊंड रॉबिन’ पद्धत?

 

- प्रत्येक संघाला ९ सामने खेळावे लागणार आहेत. त्यामधील चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

- ९ आणि ११ जुलैला उपांत्य लढती रंगणार असून १४ जुलैला अंतिम सामना खेळविला जाईल.

- उपांत्य फेरीसाठी एखाद्या संघाला ९ पैकी किमान ५ सामने जिंकणे आवश्यक आहे.

 

विराटसेना 'लॉर्ड्स'मध्ये फडकवणार का तिरंगा ?

 

भारत संघ दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. कागदावर सध्या भारताचा संघ मजबूत दिसत आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच विश्वचषक खेळण्यास उतरणार आहे. त्यामुळे या युवा संघाकडून भारताला जास्त अपेक्षा आहेत. विराट कोहलीसारखा नं. १चा फलंदाज, तसेच जस्मित बुमराह सारखा गोलंदाज आहे. तसेच, सूर गवसलेले अनेक दिग्गज खेळाडू जसे रोहित शर्मा, शिखर धवन सारखे खेळाडू संघात आहेत. त्यामुळे सर्व जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे.

 

असा असेल भारतीय संघाच्या लढती

 

५ जून - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (साऊदम्प्टन)

९ जून - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (ओव्हल)

१३ जून - भारत विरुद्ध न्यूझीलंड (नॉटिंगहॅम)

१६ जून - भारत विरुद्ध पाकिस्तान (मँचेस्टर)

२० जून - भारत विरुद्ध अफगाणिस्तान (साऊदम्प्टन)

२७ जून - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (मँचेस्टर)

३० जून - भारत विरुद्ध इंग्लंड (बर्मिंगहॅम)

२ जुलै - भारत विरुद्ध बांगलादेश (बर्मिंगहॅम)

६ जुलै - भारत विरुद्ध श्रीलंका (लीड्स)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@