विश्वचषकाचे अनोखे गूगल 'डूडल'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2019
Total Views |



मुंबई : आयसीसी विश्वचषक स्पर्धा २०१९च्या रणसंग्रामाला गुरुवारपासून सुरुवात झाली. जगाचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे. यानिमित्ताने गुगलने अनोखे डूडल केले आहे. स्टंप आणि बॉलच्या मदतीने हे डूडल बनविण्यात आले आहे. गूगल उघडल्यानंतर आधी हा लोगो सामान्य वाटतो, पण जसे तुम्ही सर्च करता तसे बॅकग्राउंड काळ्या रंगाची होते. त्यानंतर गोलंदाज गोलंदाजी करतो आणि फलंदाज तो बॉल टोलवतो तर क्षेत्ररक्षक तो पकडतो आणि पुन्हा गुगलचा लोगो साधा होतो.

 

यंदा एकूण १० संघ एकमेकांविरोधात लढणार आहेत. सर्वच संघ तगडे असल्यामुळे यंदा कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यावेळी राऊंड रॉबिनपद्धतीने विश्वचषक खेळवला जाणार आहे. यापूर्वी १९९२ साली या पद्धतीने विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला इतर ९ संघांशी लढताना येणार आहे. यावेळी विश्वचषकाचे स्वरूप हे खेळाडूंचा चांगलाच कस लागणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@