आर.के.स्टुडिओ गोदरेज समुहाकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2019
Total Views |


 


मुंबई : बॉलीवूडमधील कपूर परिवाराच्या मालकीचा असलेला ७० वर्षे जून्या आर.के.स्टुडीओजची अखेर विक्री करण्यात आली आहे. गोदरेज रिअल्टीज् फर्म प्रॉपर्टीजतर्फे शुक्रवारी स्टुडीओजच्या अधिग्रहणाची घोषणा केली आहे. मुंबईत चेंबूर येथे २.२ एकर परिसरात वसलेल्या या वसाहतीत आता अलिशान सदनिका आणि खासगी विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. गोदरेज प्रोर्टीज् ही गोदरेज समुहाची सहाय्यक कंपनी आहे.

 

स्टुडिओच्या ठिकाणी अलिशान घरांची होणार निर्मिती


गोदरेज समुहाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता या जागी खासगी गाळे व अलिशान सदनिकांची निर्मिती केली जाणार आहे. कंपनीने या व्यवहाराबद्दल अन्य काही खुलासा केलेला नाही. गोदरेज प्रोपर्टीजचे अध्यक्ष पिरोजशाह गोदरेज म्हणाले,
" स्टुडिओजच्या जागी आता अत्याधूनिक सोयीसुविधायुक्त घरे आणि अन्य अलिशान जागा तयार केली जाणार आहे. शहरातील प्रमुख स्थानापैकी एक असलेल्या या जागेत आमचे अस्तित्व हे कंपनीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. ग्राहकांना एका केंद्रीत ठिकाणी राहण्यासाठीचा पर्याय या द्वारे उपलब्ध होणार आहे. हे ऐतिहासिक ठिकाण आमच्या कंपनीत सामील झाले आहे " या व्यवहाराची इतर माहिती अद्याप त्यांनी जाहीर केलेली नाही.

 

रणधीर कपूर म्हणतात...

आर.के.स्टुडिओचे पूर्वीचे मालक रणधीर कपूर म्हणतात कि, "आर. के. स्टुडिओ आमच्या कुटूंबासह अनेक सिनेरसिकांसाठी महत्वपूर्ण आहे. आम्ही या वास्तूची नवी ओळख निर्माण करण्यासाठी गोदरेज समुहाची निवड केली आहे. "

 

आर.के.स्टुडिओचा इतिहास

१९४८ मध्ये आर.के.फिल्स अॅण्ड स्टुडीओची स्थापना करण्यात आली होती. २०१७ मध्ये लागलेल्या आगीत स्टुडीओचा बराचसा भाग जळून खाक झाला होता. त्यामुळे कपूर परिवाराने हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला होता. येथे चित्रिकरण करण्यात आलेला राज कपूर दिग्दर्शित 'राम तेरी गंगा मैली' हा चित्रपट १९८५ मध्ये प्रदर्शित झाला होता. शो मॅन हा इथे चित्रित झालेला शेवटा चित्रपट ठरला. यापूर्वी आर.के. फिल्मतर्फे बॉलीवुडमध्ये बरसात (१९४९), आवारा (१९५१), बुट पॉलीश (१९५४), श्री ४२० (१९५५), जागते रहो आदी चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@