सहा धातूंना द्या अक्षय चमक !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2019
Total Views |


घर चाळीतलं असो की आलिशान फ्लॅट मधलं , स्वयंपाकघरातल्या भांड्यांची स्वच्छता हा यक्षप्रश्न असतो आणि त्यासाठी घरातली गृहिणी कोणतीही तडजोड करायला तयार नसते. स्वयंपाक घरात प्रामुख्याने स्टेनलेस स्टीलची, अल्युमिनियमची आणि लोखंडाची भांडी वापरली जातात. या शिवाय हल्ली तांब्याच्या बुडाची भांडी आणि पिण्याच्या पाण्यासाठी तांब्याच्या बाटल्याही मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. या व्यतिरिक्त देवपूजेसाठी तांब्या-पितळ्याचीआणि चांदीची उपकरणे पूर्वीपासूनच वापरली जातात. ही सर्व भांडी कायम स्वच्छ आणि नव्यासारखी लख्ख असावीत यावर गृहिणीचा कटाक्ष असतो.

 

सध्या या प्रत्येक धातूच्या स्वच्छतेकरिता स्वतंत्र उत्पादने बाजारात आहेत. पण या सर्व धातूंच्या भांड्यांसाठी सध्या उपलब्ध उत्पादनांपेक्षा उत्तम असं एकाच उत्पादन मिळालं तर ? हो ! ते उत्पादन म्हणजे नवीन पितांबरी शायनिंग पावडर.

 

 

हो! हो! तीच पितांबरी ... बायको गेली माहेरीवाली ! जी तांब्या-पितळ्याच्या वस्तूंच्या स्वच्छतेकरीता गेली अनेक वर्षे घराघरांत वापरली जात आहे. नवीन पितांबरी शायनिंग पावडर आता स्टेनलेस स्टील, अल्युमिनियम, लोखंड आणि चांदी या चार धातूंनाही स्वच्छ आणि नव्यासारखं चमकदार बनवते. पण मग तांब्या-पितळ्याचं काय? अर्थात ते आणखी लकाकणार.
 

नवीन पितांबरी शायनिंग पावडरमधील स्वच्छतेची क्षमता जवळपास २० टक्क्यांनी वाढली आहे. या नवीन पितांबरी शायनिंग पावडरमध्ये केवड्याच्या आणि चंदनाच्या मंद सुगंधाचा समावेश केला आहे. त्यामुळे भांडी स्वच्छ केल्यावर वातावरणही प्रसन्न होतं.

 

अर्थात चोखंदळ गृहिणी कोणताही नवा पर्याय चट्कन स्वीकारत नाही. त्यामुळे गृहिणींनी अल्युमिनियमच्या आतून काळा  पडलेला कूकर, लोखंडाचा करपलेला तवा तेलकट झालेलं स्टीलचं पातेलं, काळवंडलेली चांदीची वाटी असं एकेका धातूचं भांडं सर्वप्रथम स्वत: नवीन पितांबरी शायनिंग पावडरने स्वच्छ करून बघावं आणि स्वत:ची खात्री झाली की त्या आपल्या कामवाल्या बायकांना या सर्व धातूंसाठी नवीन पितांबरी शायनिंग पावडरच वापरायला सांगतील याची आम्हांला खात्री आहे.

 

अक्षय्य तृतीयेचा सण लवकरच सर्वत्र साजरा होईल. त्यानिमित्ताने नवीन पितांबरी शायनिंग पावडरच्या माध्यमातून सहा धातूंनाअक्षय चमक मिळेल असा विश्वास आहे.

 

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@