थलायवानेही मान्य केला मोदींचा करिश्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2019
Total Views |




चेन्नई : लोकसभा निवडणुकीत भाजपला दुसऱ्यांदा मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनीही भारतीय राजकारणातला मोदींचा करिश्मा मान्य केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा करताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दलही सहानुभूती व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल यांना सहकार्य न केल्याने देशातील एकेकाळच्या बलाढ्य पक्षावर ही वेळ आली असल्याचे ते म्हणाले.

 

अभिनेता रजनीकांत यांनी चेन्नईतील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भारतात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या करिश्मा असलेल्या राजकारण्यांनंतर आता नरेंद्र मोदी करिश्मा असलेले नेते आहेत, असे रजनीकांत म्हणाले. सध्या संपूर्ण देशात मोदी त्सुनामी असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, आपण ३० मे या दिवशी मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले. २०१४ लोकसभा निवडणूकांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी रजनिकांत यांची भेट घेतली होती.

 

रजनीकांत यांनी कॉंग्रेस आणि राहुल गांधींबद्दल दिलेल्या प्रतिक्रीयेत 'काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना हाताळण्यासाठी राहुल गांधी फारच तरुण आहेत', असे सांगत त्यांच्याबद्दलचे स्थान अधोरेखित केले. सध्या राहुल गांधी यांनी दिलेल्या राजीनाम्यावरून वादंग सुरू आहे. 'राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये', असे मत त्यांनी व्यक्त केले. राहुल गांधीनी स्वत:ला सिद्ध करावे', असेही ते म्हणाले.

 

"लोकशाहीत विरोधी पक्ष हा मजबूत असायला हवा. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीत विशेष मेहनत घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राहुल यांच्यात नेतृत्वगुण कमी आहेत, असे नाही, मात्र त्यांच्यासाठी काँग्रेस पक्षाला हाताळणे कठीण आहे असे आपल्याला वाटते, असे रजनीकांत म्हणाले. काँग्रेसहा जुना पक्ष आहे, या पक्षात वरिष्ठ नेत्यांची संख्या अधिक आहे आणि राहुल मात्र फारच तरुण आहेत. या ज्येष्ठ नेत्यांना निवडणुकीत परिश्रमही घेतले नाहीत आणि राहुल गांधीसोबत समन्वयही साधला नाही." असे विश्लेषणही रजनीकांत यांनी केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat




@@AUTHORINFO_V1@@