मोदी सरकार करणार ७५ हजार नोकर भरती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2019
Total Views |



 

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निवडून आलेल्या नव्या सरकारने विरोधकांकडून उचलल्या जाणाऱ्या मुद्द्यांवर सर्वात आधी काम करण्याचा निश्चय केला आहे. यापूर्वी बेरोजगारी हा मुद्दा लोकसभा निवडणूकीत वापरला होता. त्यामुळे मोदी सरकार आता केंद्रातील ७५ हजार रिक्त जागांची त्वरीत भरती करणार आहे. पंतप्रधान कार्यालयातर्फे ३० जूनपर्यंत सर्व विभागांकडून रिक्त जागांचा अहवाल मागवला आहे.

 

लवकरत त्यांची भरती प्रक्रीया सुरू केली जाणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (एसएससी) मार्गदर्शनात या जागांसाठी भरती प्रक्रीया राबवण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार भाजप सरकार आता असंघटीत क्षेत्रांसाठीही मोठी योजना लागू करण्याच्या तयारीत आहे. मेक इन इंडिया या योजनेला पुन्हा बळ देण्याचा विचारही भाजपने केला आहे. या अंतर्गत बांधकाम क्षेत्र, सेवा क्षेत्र आदी क्षेत्रांच्या वाढीस मदत मिळू शकणार आहे. यासह स्कील इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत कौशल्य विकासावरही भर दिला जाणार आहे.

 

या क्षेत्रांमध्ये होणार नोकऱ्या उपलब्ध

· ऑटोमोबाईल

· कन्झ्युमर गुड्स

· बीएफएसआय

· हेल्थकेअर

· टेक्नॉलोजी - आयटी

· रिटेल सेक्टर

· इंफ्रास्ट्रक्चर

· डिफेंस

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@