मार्क्स, मार्क्सवाद आणि सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2019
Total Views |

 

 

दोघांच्याही जीवनाकडे बघितले, तर त्यांचे जीवन हे क्रांती करण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रांतिकारकासारखे दिसते. पण, मार्क्स हा क्रांतीचा विचार देऊन समीक्षा करून थांबतो, तर सावरकर स्वत: क्रांती करण्यासाठी सिद्ध असलेले दिसतात.
 

पाश्चात्त्य विद्वान हेन्री जेम्सने लिहिले आहे की, “एखादा इतिहास कधी घडतो? विचार व व्यक्तिमत्त्व या दोघांची असीम शक्ती जेव्हा एकत्रित संगमातून येते तेव्हा इतिहास घडतो.विसाव्या शतकात जगभर प्रेरणा निर्माण करणारे हे दोन महापुरुष दोन वेगळ्या कालखंडात जरी जन्माला आले असले तरी, त्यांच्यातील साम्ये, विचारांची ओळख व त्यांची प्रासंगिकता यांचा आज विचार होणे आवश्यक आहे. कारण, आजच्या भारतात सावरकरवादाचे सर्वात मोठे वैचारिक विरोधकहे मार्क्सवादी किंवा त्यांच्यात वैचारिक मुशीतील आहेत आणि मार्क्सवादीसुद्धा हिंदुत्ववाद्यांना शत्रूंच्याच रूपात सातत्याने बघतात.

 
दोघांमधील साम्ये
 

मार्क्सनी मानवाच्या कहाणीचा अर्थ विरोधविकासवादाच्या पद्धतीनुसार लावला, तर सावरकारांनी हिंदुस्थानच्या उत्थान-पतनाचा अभ्यास हिंदुत्वया संकल्पनेच्या आधाराने करून, भारतीय चिंतनाला एक क्रांतीचा आयाम दिला. दोघांनाही अतिशय समर्थ अशी लेखणी लाभली होती. अगदी विवाद्य विषयांवरील दोघांचे झोंबणारे लिखाण आपण वाचले, तर त्याच्या दाहकतेने आपण अस्वस्थ होतो. माणसाने स्वत:च्या प्रगतीसाठी कुठल्याही अतिंद्रिय शक्तीवर अवलंबून न राहता, त्या शक्तीवरच्या अंधश्रद्धेतून मुक्त व्हावे व तसेच परलोकातील शक्तींच्या भीतीपासून आणि प्रस्थापित व्यवस्थांच्या शोषणकारी संगनमतातून सुटका करून घ्यावी, असा वैज्ञानिक विचार दोघांनीही मांडला. शोषणरहित समाज दोघांच्यासाठी श्रद्धेचा विषय होता.

 

दोघेही प्रचलित परिस्थितीसंबंधी असंतुष्ट होते आणि परिवर्तनाची तीव्र निकड त्यांना वाटत होती. एक ना एक दिवस माझ्या मार्क्सवादी चिंतनाप्रमाणे समाज घडेल,” असा म्हणणारा मार्क्स अन् भविष्यात पुन्हा विभाजित झालेला भारत अखंड भारतकरू म्हणणारे सावरकर मला आशावादाच्या व आत्मविश्वासाच्या मूर्ती वाटतात. त्यांच्या जीवनाच्या कल्पना या प्रकाश व अंधारासारख्या होत्या. या दोन शक्तींत जशी कुठलीही तडजोड शक्य नसते, तसे कुठल्याही तडजोडीचा दोघांनाही तिरस्कार होता. संघर्षशील जीवन असणे व अखेरपर्यंत संघर्ष करण्यावर दोघांचाही भर होता. एखाद्या ध्येयासाठी आपल्या संपूर्ण जीवनाची कुरवंडी करून फक्त ध्येयासाठी वैयक्तिक जीवनातल्या हालअपेष्टा सहन करूनही प्रचंड कार्य व ग्रंथलेखन हा अजून एक समान दुवा मला वाटतो. दोघांच्याही जीवनात एक विकासक्रम दिसून येतो. झुंजारपणा दोघांच्याही स्वभावातच होता. त्यांचे भव्य स्वप्न हे सर्व मानवजातीसाठी होते. दोघांचाही उद्देश हा नुसते भाष्य करणे कधीच नव्हता, तर जग बदलून टाकणे हा होता.


विचारधारा व संकल्पना


चिंतन दोघांच्याही कालखंडाचा विचार करता वरील गुण जरी समान असले तरी
, त्यांच्या विचारांचे केंद्रबिंदू वेगळे होते. सावरकरांचा राष्ट्रआणि मार्क्सचा अर्थहे चिंतनाचे केंद्रबिंदू होते. या दोन केंद्रबिंदूभोवती दोघांचीही जीवने व्यतीत झाली होती. दोघेही मूलगामी विचारवंत होते, पण त्यांच्या पूर्वसुरींकडून त्यांनी अनेक विचार संकल्पना घेतल्या व त्यांचा नवनिर्मितीसाठी उपयोग केला. या बाबतीत दोघांनीही दुर्मीळ व अभिजात कल्पकता दाखवली. मार्क्सचे ज्या वर्षी निधन झाले, त्याच वर्षी सावरकरांचा जन्म झाला. दोघांच्याही विचारधारा वेगळ्या होत्या, पण मार्क्सचा विचार हा जागतिक परिप्रेक्ष्यातून आलेला दिसतो, तर सावरकर हे राष्ट्रहिताकडून मानवतावादाकडे गेलेले दिसून येतात. राष्ट्रहित प्रथम, बाकीचे नंतरहा त्यांच्या विचारांचा मुख्य स्वर होता.

 
क्रांती 

दोघांच्याही जीवनाकडे बघितले, तर त्यांचे जीवन हे क्रांती करण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रांतिकारकासारखे दिसते. पण, मार्क्स हा क्रांतीचा विचार देऊन समीक्षा करून थांबतो, तर सावरकर स्वत: क्रांती करण्यासाठी सिद्ध असलेले दिसतात. मार्क्सच्या क्रांतीच्या कल्पनेत सभोवतालचा समाज, परिस्थिती बदलण्याचा विचार अंतर्भूत आहे. कामगार हा त्याच्या क्रांतीचा वाहक आहे व नवा समाज स्थापन करणे, हा त्यांच्या क्रांतीचा मूळ हेतू आहे. संपूर्ण मनुष्यजात कम्युनिस्टहोईपर्यंत ही क्रांतीची चळवळ चालू राहावी व त्यासाठी हिंसा करणे अनिवार्य असल्यास ती करावी,” असे मार्क्सचे म्हणणे आहे. कारण, क्रांती ही इतिहास घडविणारी शक्ती आहे, असे तो मानतो अन् त्यासाठी दीर्घसंघर्षालाही तो तयार राहण्यास सांगतो. थोडक्यात काय, तर मार्क्सच्या क्रांतिकल्पनेची परिभाषा ही जागतिक मार्क्सवादाच्या सिद्धांत प्रतिष्ठापनेसाठी होती. याचाच अर्थ मार्क्स असेपर्यंत तरी वैचारिक साम्राज्यवादाची बिजे मार्क्सनेच टाकली होती. सावरकरांच्या क्रांतीच्या व्याख्या व संकल्पना या भारतापुरत्या मर्यादित होत्या. त्यात मार्क्ससारखा जागतिक आक्रमकपणाचा भाव नव्हता. उलट क्रांतीप्रवृत्तीच्या विसर्जनाचा जो विचार मार्क्सने दिला नाही, तर तो सावरकरांनी दिला.

सावरकरांच्या क्रांतिकल्पनेचे दोन कालखंड पडतात. एक जन्मठेपेची शिक्षा होण्यापूर्वीचा नि दुसरा रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून मुक्तता झाल्यानंतरचा. पहिल्या कालखंडात सावरकर राज्यक्रांतीच्या विचाराने प्रभावित होऊन अहर्निश प्रयत्नरत दिसले, तर दुसर्‍या कालखंडात हिंदू समाजाच्या हितरक्षणासाठी सामाजिक क्रांतीकडे वळले. राजकीय पातळीवरील परिवर्तनाच्या ध्यासाबरोबरच होणारे परिवर्तन सर्वांगपरिपूर्ण आणि दूरगामी बनेल, याचे जागते भान त्यांना होते. त्याचबरोबर सत्तेची सूत्रे हातात घेऊन स्वयंशासित होत असतानाच समाजजीवनाची सर्व अंगे शास्त्रशुद्ध, कालसुसंगत आणि प्रगमनशील दृष्टिकोनातून विकास पावली पाहिजेत, याचाही आग्रह त्यांनी जोपासला.

राज्यसंस्था व समाजव्यवस्था

मार्क्स अन् मार्क्सवाद्यांसह सावरकरांनाही एका नव्या समाजरचनेची सामाजिक ओढ होती. मार्क्सवादात त्या व्यवस्थेला वर्गविहिन समाजअसे नाव ते देतात व तेच आपले अंतिम लक्ष्य मानतात, पण त्या अंतिम समाजव्यवस्थेचा प्रत्यक्ष उदय होण्यापूर्वी ते एका समाजवादी राज्याची संकल्पना करतात, जेथे व्यक्तींच्या श्रमाचे शोषण होणार नाही व माणूस शोषणाच्या ओझ्यापासून मुक्त असेल, त्यालाच मार्क्सने स्वत्त्वापासून दूर जाणेम्हणजे आत्मदुरावाअसे म्हटले असून त्याच आदर्श व्यवस्थेला स्वत्त्वाच्या साक्षात्काराची अवस्थाअसे म्हटले आहे. त्यामुळेच स्वाभाविकपणे मार्क्सवाद्यांना स्वत्त्वापासून दूर राहण्याच्या अवस्था बदलून, स्वत्त्वाच्या साक्षात्काराची अवस्था गाठण्याची उत्कट इच्छा असते व त्यासाठीच त्यांचा क्रांतिसंघर्ष विचार असतो, असे ते म्हणतात. इथे ते एका नवीन समाजराज्याची स्वप्ने पाहतात.

 

सावरकरांनीही अशाच एका विचाराचा उद्घोष केला होता आणि तो म्हणजे, ‘हिंदुत्वाच्या आधारशीलेवर आधरलेले हिंदुराष्ट्र.त्यांनीच म्हटल्याप्रमाणे, अंदमानातून ते हिंदुत्वाची किंकाळी फोडून बाहेर आले. कारण, त्यावेळच्या काँग्रेसच्या राजकारणाचा पाया हा गांधीजींमुळे हिंदू-मुस्लीम ऐक्य हा झाला होता. त्यातून वाढणार्‍या मुस्लीम अनुनयाने मुस्लिमांच्या अवास्तव अलगतावादी मागण्यांना ऊत येऊ लागला. अशा वेळी त्या वातावरणाच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहणार्‍या नेत्यांजवळ तितक्याच ताकदीचे तत्त्वज्ञान हवे होते. त्या तत्त्वज्ञानाची पूर्तता सावरकरांच्या हिंदुत्व व हिंदुराष्ट्रया विचाराने पूर्ण केली. पण, त्यामध्ये कुठेही इतर घटकांबाबत शत्रुत्वाची भावना नव्हती. धर्मनिष्ठेपेक्षा देशनिष्ठेला महत्त्व देणारा तो हिंदू व त्या सर्वांचे ते हिंदुराष्ट्रही त्यांची भूमिका सावधानतेची होती. सगळ्यांची त्वेविसर्जित झाल्यानंतर त्यात माझेही त्वविसर्जित करून ते वैश्विक माणूस होण्यासही तयार होते. कारण, हिंदुस्थानावाचून हिंदूंना त्याही वेळी गती नव्हती व आजही नाही. 

 

धर्मविचार 

 

इतिहासात धर्मावरून जेवढी युद्धे झाली, तेवढी अन्य कशावरूनही झाली नाहीत. म्हणूनच मार्क्सचे मत होते की, “धर्म हा अफूच्या गोळीप्रमाणे आहे आणि मानवी कल्याणासाठी धर्म पूर्णपणे नष्ट करून टाकला पाहिजे.मार्क्स आणि ऐंगल्स यांच्या धर्मविषयक कल्पना या हेगेल यांच्या जडवादी लिखाणातून झाल्या व त्यांचे अफूचे मत हे सेमेटिकधर्मांच्या संपर्कात आल्यामुळे झाले होते. त्यांनी अभ्यास करून लिहिलेल्या के मार्क्स अ‍ॅण्ड एफ. ऐंगल्स ऑन रिलिजनया ग्रंथात त्यांनी जुडेइझम, ख्रिश्चनॅनिटी आणि इस्लाम इ. धर्मांचे विपुल संदर्भ दिले आहेत. त्यात हिंदू धर्माचा एकही संदर्भ नाही. त्यामुळे त्यांचा धर्मनिषेध हा सेमेटिकधर्मांना लागू होतो. मार्क्सचा धर्माला विरोध असण्याचे आणखी एक कारण म्हणजे, धर्माचा विज्ञानाला असणारा विरोध! कारण, पाश्चात्त्य देशात धर्माचा इतिहास म्हणजे वैज्ञानिक विचारांच्या वाढीला झालेला विरोधी इतिहास होय. थोर शास्त्रज्ञांना चर्चने अत्यंत क्रूरपणे मारले, छळ केला. संशोधनावर बंदी घातली. या सगळ्या इतिहासाच्या अवलोकनातून त्यांचे हे मत होणे अगदी स्वाभाविक होते.

सावरकरांना हा फरक चांगल्या प्रकारे समजला होता. धर्मविचारधर्मरूढीयांच्यातील फरक ते समजत होते. आपल्या अनुयायांना जो दुबळे बनवितो, असा धर्मविचार त्यांना कधीच मान्य झाला नाही. अत्यंत विज्ञाननिष्ठ व ऐहिक प्रगतीच्या दृष्टिकोनातूनच त्यांनी धर्माचा विचार केला. त्यांची सनातन धर्माची व्याख्या ही जे सृष्टीनियम विज्ञानास प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगान्ती सर्वथैव अबाधित राखेल, तोच शाश्वत सनातन धर्म होय,” अशी बुद्धिनिष्ठ होती. धर्माचे पारलौकिक क्षेत्रातील महत्त्वही सावरकर उत्तमप्रकारे जाणून होते. पण, त्यांचा पिंडच ऐहिकवादी विचारांचा असल्याने धर्ममतांमध्ये जे चिरंजीव सत्य आहे व आज ग्राह्य आहे, ते घ्यावे असे सावरकर सांगतात. धर्मविवेचनात सावरकरांची भूमिका ही मनुष्यजातीच्या उद्धारार्थ झटू पाहणार्‍या सत्यशोधकाची होती. मार्क्सने अज्ञानाने हिंदू धर्माची जशी निंदानालस्ती केली, तशी सावरकरांनी इतर धर्मांची कधीच केली नाही. त्यांनी अभ्यासपूर्वक इतर धर्मांविषयी मते मांडली. मानवजातीच्या कल्याणाची आत्यंतिक तळमळ ही धर्माची व्यावहारिक मिती आहे.


आर्थिक विचार

मार्क्स आणि सावरकर यांच्या आर्थिक चिंतनातला मूलभूत फरक म्हणजे, सावरकरांनी मार्क्सच्या वर्गविग्रहाला विरोध करून स्वत:चा वर्गहिताचा राष्ट्रीय समन्वय मांडला. मार्क्स म्हणतो, “माणूस नैतिक बनवण्यासाठी समाजाची अर्थव्यवस्था बदलावी लागेल. त्यातून समाजरचना बदलेल आणि समाज बदलल्याशिवाय माणूस बदलत नाही आणि जोपर्यंत माणूस बदलत नाही, तोपर्यंत तो नैतिक बनत नाही.कारण, मार्क्सवादानुसार समाजवादहे उत्तर वैयक्तिक दु:खाचे नसून सामाजिक दु:खाचे आहे. थोडक्यात काय, तर मार्क्सचा आर्थिक सिद्धांत हा कामगारांच्या हुकूमशाहीकडे जातो. जगातल्या कामगारांनो एक व्हा!हा त्याचा नाराच आहे. त्यामुळे श्रमआणि भांडवलयांच्या संघर्षातून एक नवाच संघर्ष जन्माला येऊन तेथे माणूस हा केंद्रस्थानी न राहता राज्यसंस्था किंवा व्यवस्था केंद्रस्थानी राहते.

 

सावरकरांना मार्क्सचा श्रममूल्यांचा सिद्धांत मान्य होता. परंतु, त्याचे विचार हे एकांगी असून ते काळाच्या ओघात टिकणार नाहीत, असे ते म्हणत. मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाहीहे ख्रिस्तांचे वचन समर्पक आहे, तरी भूकआणि भाकरीयांच्याव्यतिरिक्त वैषयिक बौद्धिक भावनानिष्ठ अशा अनेक इच्छा माणसाला असतात. मनुष्याला पोट आहे, पण पोट म्हणजे फक्त माणूस नाही आणि म्हणून सारे मानवी व्यवहार एकाच आर्थिक सूत्रात गोवता येणार नाहीत, हेही त्यांनी स्पष्ट केले. जगामध्ये मार्क्सवाद ज्या कारणांनी कोसळला, त्याची समीक्षा सावरकरांनी फार मूलभूत केली. समतावाद आणि भांडवलशाही या दोन शब्दांचे योग्य अर्थ आपण समजून घेतले पाहिजेत. उगाच शब्दच्छल व नसते अर्थ लावून परकीय तत्त्वांचा अट्टाहास धरणे योग्य नाही,” असे ते म्हणत. त्यांच्या मते, आर्थिक पायावर आपण सर्व भारतीयांना संघटित केले, तर धार्मिक, वांशिक, राष्ट्रीय नि सांस्कृतिक संघर्ष धुक्यासारखे विरून जातील, हे स्वप्न आहे.

 

त्यामुळे व्यवहारी दृष्टिकोन ठेवूनच राष्ट्रासाठीचा आपला आर्थिक कार्यक्रम आखलेला असला पाहिजे. आपल्या आर्थिक विचारसरणीचे सूत्रमय वर्णन वर्गहितांचा राष्ट्रीय समन्वय असे ते करतात. त्याचा थोडक्यात अर्थ म्हणजे, देशाने भांडवलदार व श्रमजीवींची व त्यांनी देशाची काळजी घेणे असा करता येईल. थोडक्यात काय, तर ज्यावेळी युरोपातील अर्थतत्त्वज्ञ कॅपिटल मार्क्सच्या पलीकडे जायला घाबरत होते, तेव्हा सावरकरांचे या क्षेत्रातील चिंतन त्यांच्या एकमेवाद्वितीयतेची व द्रष्टेपणाची झलक दाखवून देते.

 

मार्क्सवादी विचारक : भारत आणि सावरकर

 

सावरकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू अगोदर सांगितल्याप्रमाणे राष्ट्रत्यातही हिंदुराष्ट्रही संकल्पना आजही वैज्ञानिक पद्धतीने न समजल्याने अनेक वैचारिक शत्रू आजच्या भारतात सावरकरांना निर्माण झालेत. त्यातले सर्वात मोठे शत्रू म्हणजे कम्युनिस्ट व तथाकथित पुरोगामी वर्ग होय. सावरकरांचे हिंदुत्वहिंदुराष्ट्रवादहा कुठेही भारतीय राज्यघटनेला विरोधी नाही. पण, ‘हिंदू असणे म्हणजेच प्रतिगामी असणेअन् हिंदुत्वाचा विचार करणे म्हणजेच मुस्लीमविरोधी असणेहे फार नियोजितपूर्वक भारतीय राजकीय पटलावर बिंबवले गेले. त्यात या मार्क्सवादी विचारसरणीचा फार मोठा वाटा आहे.

 

ज्याप्रमाणे प्रत्येक प्रेषित व धर्मपंथाच्या विचारांची दुर्दशा त्यांचे अंध आणि अतिरेकी अनुयायीच करतात, त्याचप्रमाणे भारतातील कम्युनिस्ट समाजवादी विचारधारेचेही झालेले आहे. मार्क्सवाद म्हणजे त्यांच्या अंधसमर्थकांसाठी एका धर्ममताप्रमाणेच होऊन बसला आहे. भारताच्या मूळ मानसिकतेचा, परंपरेचा डोळस अभ्यास न करता मार्क्स व त्यांच्या अनुयायांनी अज्ञानाने केलेल्या विचारांवरच हे आपल्या विचारांचे इमले चढवतात. मुळातच मार्क्सच्या विचारात एक फार मोठे न्यून राहिले आहे. ते म्हणजे राजकीय बाबतीत त्यांनी राष्ट्र, राज्य व राष्ट्रवादयाकडे अगदीच जुजबी लक्ष पुरविले आहे. पण, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमध्ये नि नंतरही इतरही जगभरात राष्ट्रवादी विचारप्रणालीने समाजवादाशी स्पर्धा केलेली आहे नि त्यात बहुतांशी वेळी राष्ट्रवादच प्रभावशाली ठरल्याचे प्रत्ययास येते. गंमत म्हणजे, सगळ्या साम्यवादी शासन संस्थेच्या स्थिरतेत राष्ट्रवादाचा एक पाया असलेला आपल्याला दिसून येतो. माओचा चीन, लेनिनचा रशिया, फिडेल कॅस्ट्रोचा क्युबा ही त्यांची उदारहणे आहेत.

 

येथील परंपरेबाबत संस्कृतींबद्दल त्यांना घृणाभावच आहे आणि या लिखाणाचे मूळ मार्क्सच्या लिखाणात सापडते. मार्क्सला भारताबद्दल कधीच आत्मीयता वाटली नाही. ब्रिटिशांमुळे भारतात ऐक्य निर्माण झाले, ब्रिटिशांमुळे भारताच्या नवनिर्मितीचा मार्ग प्रशस्त झाला, असे मार्क्सला वाटे. हिंदू संस्कृतीला तर तो हीन समजत असे. मार्क्सच्या भारतलेखनात प्रचंड अज्ञान आहे. हेगेलच्या मताचे सावट त्यावर आहे आणि त्याच मतांचा प्रभाव हा भारतीय कम्युनिस्ट व पुरोगामी विचारधारेवर आहे.

 

व्यक्तिमत्त्व दर्शन

 

प्रस्तुत लेखाच्या शेवटाकडे येताना असे दिसते की, ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे निखळ विरोधी व्यक्तिमत्त्वे नसून त्यांच्यात काही साधर्म्यही आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वांची काही समान वैशिष्ट्ये आहेत. समाजातील दलित, पीडित, शोषित यांच्या उत्थानाचे कार्य दोघांनीही पूर्णत: अंगिकारले होते. कार्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची पाळी आल्यास त्यांनी कधी कातडीबचाऊपणा केला नाही. कोणाला खुश करण्यासाठी त्यांनी आपल्या शब्दांची कसरत केली नाही किंवा मुद्दाम भाषेत सौम्यपणा आणला नाही. जे सत्य त्यांना भावले ते निःसंदिग्धपणे सांगण्यास ते कचरले नाहीत. विचारांच्या शक्तीवर दोघांचाही विश्वास होता. वाट्टेल ते कष्ट पडले तरी ज्ञान संपादन करण्याची त्यांची जिद्द होती. दोघेही झुंजार वृत्तीचे होते. सावरकरांनी केलेली अनेक भाकिते स्वतंत्र भारतात खरी झालेली दिसतात, तर मार्क्सनी केलेली मूळ भाकितेसुद्धा आपल्याला कोसळलेली दिसतात. या दृष्टीने द्रष्टेपणात मार्क्सपेक्षा सावरकर फार उजवे ठरतात.

 

थोडक्यात काय, तर मार्क्सवादी विचारांतील मूलभूत अपूर्णता मान्य करण्यास परिस्थितीनेच भाग पाडले. रशियातील क्रांती आणि तेथील श्रमिकांची हुकूमशाही ही मार्क्सवादाची प्रयोगशाळा होती. त्या प्रयोगाचे कोणते धिंडवडे निघाले ते आपण पाहतोच आहोत. सावरकरांचा आग्रह म्हणजे हिंदू जीवनदर्शनाची प्रयोगशाळा भारतातच राहणे अपरिहार्य आहे. तेव्हा आधुनिक भारताने जागृत होऊन आपल्या आदर्शानुसार लोकजीवन उभे करून दाखविले पाहिजे. भारताच्या जागृतीचा व येऊ घातलेल्या मंगल पुनरुत्थानाचा आशावादी उल्लेख त्यांच्या लिखाणात आढळतो.

 

शंतनू रिठे

९८८१९६८६७७

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@