पारदर्शकता आणि मेहनतीला पर्याय नाही - नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |




वाराणसी : काशीतल्या लोकांनी दिलेल्या आशीर्वादामुळे मी विजयी झालो. हा विजय कार्यकर्त्यांचा असून उत्तर प्रदेशने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिल्याचा आनंद वाटतो, असे नरेंद्र मोदी यांनी काशी येथे बोलताना म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काशीमध्ये जाऊन बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पं. दीनदयाल हस्तकला संकुलात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

 

त्यासोबतच आपण लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. विरोधकांवर जनतेचा अविश्वास असल्याने त्यांची संख्या कमी असली तरी ज्यावेळी आवश्यकता वाटली त्या त्यावेळी आम्ही विरोधकांच्या आवाजाला महत्व दिल्याचे मोदी म्हणाले. २०१४, २०१७ आणि २०१९ अशा तीन विजयांची हॅट्रिक उत्तर प्रदेशाने दिली. या विजयानंतरही राजकीय पंडितांचे डोळे उघडत नसतील तर त्यांचे विचार २१ व्या शतकातील नाहीत तर २० व्या शतकातील असल्याचा टोला मोदींनी यावेळी लगावला.

 

पारदर्शकता आणि परिश्रम असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. देशातील जनतेनेही पारदर्शकता आणि परिश्रम याला कोणताही पर्याय नसल्याचे दाखवून दिले आहे. देशात आज कोणता राजकीय पक्ष इमानदारीने लोकशाहीला मानणारा पक्ष असेल तो फक्त भाजप असल्याचेही मोदी म्हणाले. दरम्यान, यावेळी मोदींनी वाराणसी व उत्तर प्रदेशमधील जनतेचे आभार मानले.

 

काशीच्या जनतेचा मोदींवर विश्वास कायम असल्याचे अमित शाह म्हणाले. वाराणसीतील जनतेचे आभार मानताना अमित शाह म्हणाले, आव्हानांचा सामना करण्यासाठी मोदी नेहमीच तयार असतात, काम नसेल तर मोदी काम शोधतात त्यामुळे येत्या काही दिवसात काशीतील फरक तुम्हाला दिसून येईल असेही शाह म्हणाले.

 

२० क्विंटल गुलाबाचा वर्षाव

 

मोदींचा विश्वनाथ मंदिराकडे जाणारा मार्ग झेंडे-फलक आणि भगव्या रंगाच्या फुग्यांनी सजवण्यात आला होता. मोदींच्या स्वागतादरम्यान तब्बल २० क्विंटल गुलाबांचा वर्षाव करण्यात आला. याशिवाय संपूर्ण शहराला भगवा रंग देण्यात आला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@