काळ्यापैशाविरोधातील मोहीम तीव्र : स्वीस बॅंकेतर्फे ११ जणांना नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : स्विर्त्झलॅण्ड सरकारतर्फे स्वीस बॅंकेत भारतीयांनी ठेवलेल्या काळ्यापैशाविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. : स्विर्त्झलॅण्ड सरकारतर्फे पंचवीसहून अधिक नोटीसा जाहीर केल्या आहेत. त्याअंतर्गत बॅंकेने खातेधारकांना शेवटची संधी दिली आहे. भारत सरकारतर्फे स्विझबॅँकेशी विशेष सूचनांद्वारे खातेधारकांची माहीती देण्यासंदर्भात करार करण्यात आला आहे.

 

करचोरीनंतर खातेधारकांना नोटीसा

आपल्या खातेधारकांची माहीती गोपनीय राखण्यासंदर्भात स्वीस बॅंक जगभरात प्रसिद्ध आहे. करचोरीच्या प्रकरणांनंतर आता ही गोपनीयता हटवण्यात येणार आहे. या संदर्भात भारत सरकारशी एक करार करण्यात येणार आहे. स्वीस बॅंकेने इतर देशांशीही असा करार केला आहे.

 

खातेधारकांच्या नावाची सुरुवातीची तीन अक्षरे जाहीर

स्वीस बॅंकेच्या परदेशी ग्राहकांची माहीती देण्यासंदर्भात स्विर्त्झलॅण्डच्या फेडरल टॅक्स विभागाने नोटीस जाहीर केली आहे. त्यात खातेधारकांच्या करचोरी प्रकरणांबद्दलची प्रक्रीया आणखी जलद करण्यात आली आहे. विशेषतः भारतातील काही प्रकरणे रडारवर आहेत. स्विर्त्झलॅण्ड सरकारने जाहीर केलेल्या माहीतीनुसार, नावाची आद्याक्षरे जाहीर केली आहेत. याशिवाय खातेधारकाचे नागरिकत्व आणि जन्मतारीखही जाहीर करण्यात आली आहे. तर कल्पेश हर्षद किनारीवाला, (जन्म - मे १९४९) आणि कृष्ण भगवान रामचंद्र (जन्म १९७२) यांची पूर्ण नावे जाहीर करण्यात आली आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@