पाकिस्तानच्या राजनैक अधिकाऱ्यांना सुषमा स्वराजांचे हे उत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2019
Total Views |

 


संयुक्त राष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सुषमा स्वराज यांच्या हजरजबाबीपणाचे दर्शन देशवासियांना घडले. पाकिस्तानच्या राजनैक अधिकारी मलिहा लोधी यांनी बैठकी दरम्यान "भारत हे दहशतवाद्यांचे जन्मस्थान आहे" असे बिनबुडाचे आणि वादग्रस्त विधान केले. त्यावर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांच्या या विधानाला "खरे आहे...कारण १४ ऑगस्ट १९४७ साली भारतानेच पाकिस्तानला जन्म दिला आहे" असे सडेतोड
उत्तर देत भारताचा सच्चेपणा जगासमोर आणला आहे.

 

पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांमधील संबंध कितीही चांगले होताना दिसले तरी देखील दोन्ही देशांमधील शीतयुद्ध अजूनही धुमसत असल्याचे पुरावे वेळोवेळी पाकिस्तानकडून दिले जातात आणि याचेच एक उदाहरण म्हणजे पाकिस्तानच्या राजनैक अधिकारी मलिहा लोधी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये झालेल्या बैठकीत अतिशय बेजबाबदार विधान केले.

 

मलिहा लोधी या पाकिस्तानच्या फक्त राजनैक अधिकारी नसून पाकिस्तानच्या लष्करी धोरणामधील सल्लागार, विद्वान, संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या प्रतिनिधी, राजकीय विश्लेषक म्हणून ओळखल्या जातात मात्र इतक्या विषयात पुढाकार आणि विद्वत्ता असूनही त्यांनी असे विधान करणे ही अतिशय खेदाची बाब आहे. मात्र परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांना दाखवून दिले आहे की देशाच्या सीमारेषेवर भारत देत असलेल्या प्रत्युत्तराप्रमाणेच येथेही भारत नको ते आरोप सहन करणार नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@