नवाझुद्दीनच्या भावाचे दिग्दर्शनात पदार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2019
Total Views |

 

गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली मौनी रॉय आता समीक्षकांच्या पसंतीचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याबरोबर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'बोले चुडिया' असे या चित्रपटाचे नाव असून विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा भाऊ शम्स नवाब सिद्दीकी दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत.
 
 

या चित्रपटाचे पहिले पोस्टर देखील नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये मौनी रॉय एका खिडकीत उभी असताना दाखवण्यात आली आहे तर नवाझुद्दीन यांचा ब्लॅक आणि व्हाईट लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. शम्स नवाझुद्दीन यांचे नाव याआधी एका मीडिया कंपनीवर १०० कोटींचा दंड ठोठावल्याप्रकरणी चर्चेत होते. त्यानंतर त्या संबंधित कंपनीने शम्स यांच्या व्यवहाराविषयीच्या बातम्या अनेक ठिकाणी छापल्या होत्या ज्याचा परिणाम त्यांच्या कामावर देखील झाला.

 

मौनी रॉय चा विचार करता ती आगामी काळात आलीआ भट आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या ब्रम्हास्त्र या चित्रपटात देखील झळकणार आहे ज्यामध्ये ती खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. तसेच राजकुमार राव च्या 'मेड इन चायना' या चित्रपटात देखील ती महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@