विमानातून बॉम्बद्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2019
Total Views |

 

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज विमानातून बॉम्बद्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी काल यशस्वीरित्या घेतली. राजस्थानातल्या पोखरण इथे Su-३० MKI या विमानातून ५०० किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब सोडून लक्ष्याचा अचूक वेध घेण्यात आला.

 

नवी दिल्लीमध्ये संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या चाचणी दरम्यान बॉम्बद्वारे करण्यात आलेला मारा हा अचूक आणि सुस्पष्टपणे घेण्यात आला असल्याने चाचणी यशस्वी झाल्याचे निदान करण्यात आले आहे. तसेच बॉम्बच्या टेस्ट फायरिंग दरम्यान सर्व उद्दीष्टे पूर्ण करण्यात आली असून हा बॉम्ब भिन्न प्रकारची वॉरहेड वाहून नेण्यास सक्षम असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

 

अंमान आणि निकोबार द्वीपसमूहच्या सुखोई विमानातून भारतीय वायुसेनेने सुपरसोनिक ब्रह्मोस क्रूझ मिसाइलच्या वायुयानने यशस्वीरित्या चाचणी केल्याच्या दोन दिवसांनंतर मार्गदर्शित बॉम्बची चाचणी पूर्ण झाल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. २.५ टन एवढ्या वजनाचे हे क्षेपणास्त्र ३०० किमी उंचीवरून हवेतून जमिनीकडे मारा करण्यासाठी उपयुक्त आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय वायू सेनेच्या लढाऊ क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@