आवाज ही निसर्गाची देणगी, राखण्यासाठी कंठवटी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2019
Total Views |

बरेचदा आपल्याला स्वत:कडील वैशिष्ट्यांची जाणीव नसते. माणसाचं स्वरयंत्र ही अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. प्रत्येक प्राणिमात्राला आपला असा एक वैशिष्ट्यपूर्ण आवाज असतो. पण त्याद्वारे तो राग, आनंद,भीती अशा मोजक्याच भावना व्यक्त करू शकतो. माणूस मात्र आपल्या स्वरयंत्राच्या वापर करून भाषेच्या माध्यमातून आपल्या मनातले विचार इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. भाषेव्यतिरिक्तही गायनासारख्या कलेतून तो अनेक वेगवेगळ्या भावना व्यक्त करू शकतो. अनेक नामवंत वक्ते, अभिनेते,गायक, सूत्रसंचालक शिक्षक हे केवळ आपल्या आवाजाच्या आधारावर समाजात स्वत:चं स्थान निर्माण करीत असतात.

 
 

या स्वरयंत्राची आणि त्यातून आवाज निर्माण कसा होतो ?' ते थोडक्यात पाहू या. ज्याला आपण ढोबळमानाने 'घसा' असं म्हणतो त्या गळ्याच्या भागात अन्ननलिकेच्या पुढे आणि श्वासनलिकेच्या खाली स्वरयंत्र असतं. फुफ्फुसातून हवा बाहेर पडताना या स्वरयंत्रातील पडद्यांचं कंपन होऊन स्वरनिर्मिती होते. हे स्वरयंत्र नाजूक स्नायूंनी बनलेलं असतं.

 

पण निसर्गानं आपल्याला दिलेल्या या देणगीची आपण योग्य ती काळजी घेत नाही. अतिथंड पाणी किंवा शीतपेय, तेलकट, मसालेदार पदार्थ खाणं,खूप मोठ्याने बोलणं, अशा सवयी; सर्दी-खोकल्यासारखी आजार, वातावरणात अचानक होणारे बदल, प्रदूषण, धूर, धूळ, फळ्यावरील खडूची पावडर या आणि अशा अनेक कारणांमुळे आवाज बसणे, घशात खवखव, घसा सुजणे असे अनेक विकार होतात आणि परिणामी स्वरयंत्रावर त्याचा परिणाम होतो.

 

यासाठी आयुर्वेदात सांगितलेल्या प्रभावी वनौषधींपासून तयार केलेलं गुणकारी उत्पादन म्हणजे 'पितांबरी कंठवटी'. ज्यामध्ये घशाची आणि स्वरयंत्राची पूर्णपणे काळजी घेणाऱ्या नऊ गुणकारी वनौषधींचा उत्तम संयोग आहे. यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास 'ज्येष्ठमध' जे घशाची सूज कमी करतं, घशातला ओलावा टिकवून ठेवतं. 'कंकोळ' हे स्वरयंत्राची ताकद वाढवतं. 'खदिर' घशातली खवखव दूर करतं. अशा अनेक गुणांनी युक्त, आवाजाची काळजी घेणारी, गोड गोळ्यांच्या स्वरूपातली 'पितांबरी कंठवटी' म्हणजे घशाला आराम आणि खोकल्याला पूर्णविराम.

 

चला तर या निसर्गाच्या देणगीची काळजी घेऊ. या पितांबरी कंठवटीच्या मदतीने!

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@