प्रियांका चोप्राचे फॅनला दिलेले हे भावपूर्ण उत्तर पहिले का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2019
Total Views |


 

जगातील काही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख असलेली प्रियांका चोप्रा तिच्या समाजकारणासाठी देखील तितकीच चर्चेत असते. गेले कित्येक वर्ष युनिसेफ या संस्थेशी ती संलग्न असून लहान मुलांच्या पालन पोषणासाठी, शिक्षणासाठी जमेल तेवढी मदत करण्याचा ती प्रयत्न करताना आपण या आधी पहिले आहे. त्याचसाठी सध्या ती इथिओपिआमध्ये तेथील युनिसेफच्या कामासाठी गेली असताना तिने सोशल मीडियावर आपल्या भेटीचे फोटो पोस्ट केले. त्याचबरोबर तिच्या चाहत्यांना काही प्रश्न असल्यास ते त्यांनी विचारावे असे आव्हान देखील केले.

या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यामधील एका युझरने तिला आपल्या देशातील तिच्या प्रयत्नांबद्दल विचारले असता क्षणाचा देखील विलंब न लावता तिनी त्याला असे उत्तर दिले की, "मी या आधी देखील युनिसेफसाठी काम केले आहे. भारतात देखील अशाच प्रकारचे काम गेले काही वर्ष करत आहे. मात्र लहान मुलं ही सर्वांसाठी सारखीच आहेत मग ती भारतातील असो किंवा इथिओपियामधील रेफ्युजी कॅम्पवरील त्यांच्यासाठी काम करताना असा भेदभाव होऊ नये"

प्रियांका चोप्राचे हे काम आणि तिनी दिलेले उत्तर दोन्हीही कौतुकास पात्र आहे. प्रियांका चोप्रा बरोबरच असे अनेक बॉलिवूडमधील कलाकार आशा सामाजिक समस्यांवर काम करताना दिसत आहेत ही देशाच्या विकासासाठी एका चांगली गोष्ट म्हणावी लागेल.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@