घासून नाय ठासून ! : उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2019   
Total Views |




सोशल मीडियावर ट्रेंड झालेल्या ‘# घासून नाय ठासून’ या हॅशटॅगला साजेसा उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांचा विजय!

 

उत्तर भारतीयबहुल या मतदारसंघात विजय मिळेल आणि माजी खा. दिवंगत गुरुदास कामत यांचा मतदारसंघ असल्याने विजय निश्चित होईल, असा अंदाज बांधणार्‍या काँग्रेस उमेदवार संजय निरूपम यांना कीर्तिकर यांनी तब्बल दोन लाखांच्या मताधिक्क्याने धोबीपछाड करत काँग्रेसचा सुपडा साफ केला. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असलेल्या कीर्तिकर यांना रात्री १०.३० वाजेपर्यंत ५,६१,४८६ मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांच्या पारड्यात ३,०५,७२६ इतकी मते पडली.

 

आयत्या बिळावर नागोबाया म्हणीप्रमाणे हायकमांडवर मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी दबाव टाकत निरुपम यांनी आयता मतदार संघ पदरात पाडून घेतला. मात्र, याउलट याच मतदारसंघात गेली कित्येक वर्षे दांडगा जनसंपर्क असलेल्या कीर्तिकर आणि शिवसेनेला मतदारांनी भरभरून मते दिली. त्याउलट मनसेचा द्वेष करत मराठी माणसांविरोधी भाषा करणार्‍या निरूपम यांना त्यांची जागा दाखवून दिली. याच मतदारसंघात मनसेचा मतदार साहजिकच कीर्तिकरांकडे वळला आणि त्याचाही फायदा शिवसेनेलाच झाला.

 

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात गेल्या दशकभरात शिवेसेनेने वाढविलेल्या ताकदीपुढे उभे राहण्यासाठी तोडीचा नेता कुठल्याही पक्षाकडे नाही. त्यामुळे पुन्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्यच ठरला आहे. निरुपम यांनी स्वतःचा प्रचार करण्याऐवजी थेट वाराणसी गाठली आणि तिथे दिल्लीतल्या फळीला खुश करण्यासाठी प्रचार सुरू केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली. याचे उत्तर निरुपमांना मतपेटीतून मिळाले. गजानन कीर्तिकर यांनी सुरुवातीपासूनच आपल्या मतदारसंघात जनसंपर्क दांडगा ठेवला आहे. या भागातील शिवसैनिकांचा प्रत्येक मतदारापर्यंत असलेला थेट संपर्क आणि संकटकाळी धावून येणारा शिवसैनिक आणि पक्ष मतदारांनी स्वीकारला आणि उपर्‍यांना पुन्हा घरचा रस्ता दाखवला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@