तेजस्वी सुर्या यांना ३ लाख ३० हजारांचे मताधिक्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |



बंगळूरू : कर्नाटक दक्षिण बंगरुळू दक्षिण लोकसभा मतदार संघातून ३ लाख ३० हजारांची आघाडी घेत कॉंग्रेसच्या बी. के. हरिप्रसाद यांना मागे टाकले. "दक्षिण बंगळूरूच्या जनतेने मला दिलेल्या प्रेमाचा मी ऋणी आहे.", असे भावोद्गार त्यांनी यावेळी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत त्यांनी टाकलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाल्याचे ते म्हणाले.

 

दक्षिण बेंगळुरूचा लोकसभा उमेदवार तेजस्वी सूर्या याची देशभरात सध्या चांगलीच चर्चा रंगली होती. बेंगळुरू लोकसभा मतदार संघातून १९९६ पासून प्राबल्य आहे. भाजपचे नेते अनंत कुमार या जागेवर तब्बल सहा वेळा निवडून आले आहेत, मात्र त्यांच्या अकाली निधनाने सूर्याला उमेदवारी देण्यात आली होती.

 

तेजस्वी सूर्या हा तरुण चेहरा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा तरुण तडफदार कार्यकर्ता, अशी त्यांची ओळख आहे. बेंगळरूच्या इंस्टिट्यूट ऑफ लीगल स्टडीजमधून त्यांनी आपले वकिलीचे शिक्षण पुर्ण केले. भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश महासचिव आणि नॅशनल सोशल मीडिया टीमचे सदस्यदेखील ते राहीले आहेत. सूर्याच्या निवडीमुळे भाजपसह विरोधकहीआश्चर्यचकित झाले होते. संपूर्ण देशाचे या लढतीकडे लक्ष्य लागले होते. तेजस्वी सुर्या यांच्या विजयाने देशाच्या राजकारणात एक युवा चेहरा उदयास येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@