उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ - चढती कमान कायम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019   
Total Views |


 

मोदी लाटेचा अंदाज बांधत संभाव्य निकालांवर तावातावाने आपली मते मांडणारेही ज्या लोकसभा मतदार संघाविषयी ठामपणे आपली मते मांडण्यास टाळत होते, तो होता खासदार पूनम महाजन यांचा उत्तर-मध्य मुंबई. त्यामागचे कारण म्हणजे या ठिकाणी असलेली अल्पसंख्याक मते. साधारणत: ४-५ लाख एकगठ्ठा पडणारी मते हा या मतदार संघातला निर्णायक घटक. पण या घटकावर मात केली विलेपार्ले विधानसभा मतदार संघाने. पार्लेकरांनी आपल्या लाडक्या खासदारासाठी विक्रमी मतदान केले. कधी नव्हे एवढा पुढाकार इथल्या मतदारांनी घेतला आणि पूनम महाजन विजयाच्या दिशेने निघून गेल्या. युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षपद व त्यासाठी करावा लागणारा देशभर प्रवास अशी तारेवरची कसरत साधून पूनम महाजन यांनी या मतदार संघात मिळविलेला विजय वेगळा मानावा लागतो तो यासाठी. मोदीलाटेव्यतिरिक्त इथल्या काही मूलभूत समस्या सोडविण्यासाठी खा. महाजन यांनी पुढाकार घेतला.

विमानतळावरच्या जागेवर असलेल्या ६० हजार कुटुंबांचे पुनर्वसन, जिल्हाधिकार्यांच्या नावावर असलेल्या जागा, निवासी सोसायट्या त्यांच्या नावावर होण्यासाठी केले गेलेले प्रयत्न यासारखे सुमारे ४० वर्षे न सुटलेल्या प्रश्नांना पूनम महाजन यांनी वाचाही फोडली आणि सतत सरकारकडे पाठपुरावा करून ते प्रश्नही सोडविले. संरक्षण विभागाच्या जमिनीवर वसलेल्या ३० हजार कुटुंबांचे पुनर्वसन हा देखील या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला. एकूण १७ लाख ५० हजार मतदारांच्या मतदार संघात पूनम महाजन यांना ? मते मिळाली आहेत. या संपूर्ण आकड्यात ४ लाख, ५० हजार मुस्लीम, १ लाख ख्रिस्ती मते आहेत. ५ लाख,१५ हजार उत्तर भारतीयांची मते व अन्य सामाजिक तसेच जातीय विभागणीतही यातील बरीच मते विभागली गेली आहेत. इतक्या गुंतागुंतीच्या मतदार संघात अल्पसंख्याकांचे एकगठ्ठा मतदान हा मुळीच दुर्लक्षित न करता येणारा मुद्दा पाहिल्यास महाजन यांच्या विजयाचे अनेक सकारात्मक पैलू दिसू शकतात. येणार्या काळात पक्ष किंवा सरकार यात त्या कोणती महत्त्वाची भूमिका निभावतात, हा सगळ्यांसाठीच कुतूहलाचा विषय असेल.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@