LIVE Update : प. महाराष्ट्रामध्ये युतीचे राज्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |


 


कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच महाराष्ट्रामध्ये युतीचेच वारे वाहत असल्याचे स्पष्ट होत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

 

हातकणंगलेमध्ये शिवसेनेचे उमेदवार हे धैर्यशील माने हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मागे टाकत ३० हजार मतांची बघत मिळवली आहे. त्यामुळे गेली हातकणंगले लोकसभा मतदारसंघात गेली १० वर्षं शेतकरी नेते राजू शेट्टी यांची सत्ता आता संपुष्टात येते कि काय हि शंका निर्माण होत आहे.

 

सांगलीमध्ये भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील हे २१, ६८४ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना ९७,५४८ मते मिळालेली आहेत तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील हे ६६, ३५५ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर हे ५४,६८५ हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

 

कोल्हापूर मतदार संघामध्ये सगळ्यात मोठी लढाई पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक हे ८८ हजारांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे इथली लढत हि एकतर्फी पाहायला मिळत आहे. त्यांना आतापर्यंत एकूण २,१७,३१९ मते मिळाली आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मंडलिक यांना निवडून आणण्याचे वाचन पाळल्यामुळेच हा फरक दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांना पिछाडीवर टाकण्यात मांडलिकांना यश मिळाले आहे. 'आमचं ठरलय' हा सतेज पाटील यांचा फॅक्टर कोल्हापूरमध्ये फायदा देताना दिसत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@