Live Update: : साताऱ्यामध्ये राजेंना पाटीलांची 'टफ फाईट'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |


 


सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. या मतदार संघात युतीने सतत टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. गेली दहा वर्ष छत्रपती उदयनराजे भोसलेसातारा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. यांच्याविरुद्ध माथाडी नेते नरेंद्र पाटील हे शिवसेनेकडून मैदानात उतरले आहेत.

 

मतदान मोजणीला सुरुवात झाली तेव्हा राजे पिछाडीवर असल्याचे दिसून येत होते. मात्र दुपारपर्यंत उदयनराजे यांनी पाटीलांपेक्षा ४० हजार मतांनी पुढे आहेत. उदयनराजेंना २,०१,२६६ मते मिळाली आहेत तर त्यामागे नरेंद्र पाटील यांना १,५८,३५८ मते मिळाली आहेत. यामध्ये पाटील यांनी राजेंना चांगली टक्कर दिल्याचे समोर आले असले तरी सत्ता मात्र उदयनराजेंची येईल असेच दिसत आहे. हॅट्रिक मारण्याची संधी उदयनराजे भोसले यांनी मिळत असल्याचे दिसत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@