'या' काँग्रेस नेत्याचा पराभवाच्या झटक्याने मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |



भोपाळ : लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे वाढते आकडे पाहून काँग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते रतन सिंग यांचा मतमोजणीच्या वेळीच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. भाजपला २०१४ मधील लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत मोठा विजय मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे.

 

काँग्रेसचे नेते रतन सिंग निवडणुकांचे कल जाणून घेण्यासाठी मतमोजणी केंद्रावर गेले होते. रतन सिंग हे मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळी निकाल पाहून त्यांच्या छातीत दुखू लागले. छातीदुखी वाढल्याचे त्यांनी काही कार्यकर्त्यांनाही सांगितले. तेवढ्यातच ते जागेवर कोसळले. रतन सिंग यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@