विधानसभा निवडणूकांमध्येही भाजपचा बोलबाला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |


कॉंग्रेसच्या गडाला सुरूंग : अरुणाचल प्रदेशमध्ये भाजप २४ वर तर, कॉंग्रेसला केवळ ४ जागा

 


नवी दिल्ली : देशभरात आज जरी लोकसभा निवडणुकांच्या निकालांसह देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचाही लागणार आहेत. या पैकी काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या अरुणाचल प्रदेशात भाजपने मुसंडी मारली आहे. अरुणाचल प्रदेशात भाजप २४ जागांवर पुढे तर काँग्रेस केवळ चार जागांवर पुढे दिसत आहे.

 

विशेष म्हणजे मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अरुणाचल प्रदेशात केवळ ११ जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेस ४२ जागांसह सत्ताधारी पक्ष बनला होता. परंतु मोदी सरकारची काँग्रेसमुक्त भारताची घोषणा अरुणाचल प्रदेशातही खरी ठरताना दिसत आहे. काँग्रेची ४२ वरून चारवर घसरगुंडी झाली आहे. पीपीए पक्षाचे पाच तर अपक्ष उमेदवारापैकी सहा जण आघाडीवर आहेत.

 

आंध्रप्रदेशातही विद्यमान सरकार असलेली तेलगू देसम पक्षाला आपल्या जागा राखता आलेल्या नाहीत. वायएसआर काँग्रेस पक्षाने राज्यात मोठी आघाडी घेतली आहे. गेल्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेस पक्षाला ६७ जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र, तब्बल १४७ जागांवर वायएसआरचे वर्चस्व दिसून येत आहे. त्यापैकी ४० जागांवर त्यांचा विजय झाला आहे. तेलगू देसम पक्षाला केवळ २७ जागा मिळताना दिसत आहेत.

 

ओडिशा राज्यात विधानसभा निवडणुकांत बिजू जनता दल बाजी मारणार असल्याचे चित्र आहे. भाजप या ठिकाणी क्रमांक दोनचा पक्ष मात्र, भाजप बनत आहे. गेल्या निवडणुकीत ओडिशा राज्यात ११७ जागांवर विजय मिळवत बिजू जनता दलाने सत्ता काबीज केली होती. तर भाजपला केवळ दहा तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्या होत्या. सद्य स्थितीत भाजप २५ जागांवर पुढे आहे, तर काँग्रेस १३ जागांवर पुढे आहे.

 

याहीवेळी बिजू जनता दलच सत्ता काबीज करणार असल्याचे चित्र आहे. बिजू जनता दल १०६ जागांवर आघाडीवर आहे. सिक्कीम विधानसभा निवडणुकीत एसडीएफ बारा जागांवर पुढे आहे, तर एसकेएम पक्ष ११ जागी पूढे आहे. बहुमतासाठी १२ इतक्या जागा अवश्य आहेत. त्यामुळे सिक्कीम मध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@