शेअर बाजार उजळला : सेन्सेक्स ४० हजारांवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2019
Total Views |


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे कौल भाजपप्रणित एनडीएच्या बाजूने लागली आहे. शेअर बाजारानेही मोठी उसळी घेतली. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स पाचशे अंकांनी वधारला. निफ्टीने १५० अंकाची उसळी घेतली आहे. सुरुवातीच्या १५ मिनिटातच शेअर बाजार ८०० अंकाने वधारून ३९८५० वर पोहोचला, शेअर बाजाराने गुरुवारी ४० हजारांचा टप्पा पार केला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत बाजाराने ९३५ अंशांनी उसळी घेतली आहे, 
.

एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर सेन्सेक्स ३९ हजार ५७१ अंकावर पोहोचला होता. तर निफ्टी दोनशे अंकांनी वाढून ११ हजार ९३० वर गेला होता. त्यामुळे आज निफ्टी १२ हजाराचा पल्ला गाठेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर रविवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोलचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले होते.


१७ व्या लोकसभेसाठी देशातील ५४३ मतदारसंघात निवडणूक पार पडली आहे. त्यापैकी ५४२ जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. पैशाचा अमाप वापर झाल्याचे सिद्ध झाल्याने तमिळनाडूतील वेल्लूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. अंतिम निकाल हे गुरुवारी रात्रीपर्यंत स्पष्ट येण्याची शक्यता आहे. सध्या भाजपप्रणित एनडीएने देशभरातील बहुतांश जागांवर आघाडी घेतल्याचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर उमटत आहेत. सकाळी दुसऱ्या फेरीतील मतमोजणीपर्यंत भाजपने २७९ तर कॉंग्रेसने ५१ जागांवर आघाडी मिळवली आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@