अभिमानास्पद ; रिसेट-२बी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने बुधवारी पहाटे इस्रोने रिसेट-२ बीआर१ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. तामिळनाडूतील श्रीहरीकोटामधील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र येथून पीएसएलवी-सी ४६ रॉकेटद्वारे बुधवारी पहाटे ५:२७ वाजता उपग्रह अवकाशात झेपावला. हे प्रक्षेपण महत्त्वाचे मानले जाते होते कारण रिसेट उपग्रह मालिकेतील हा चौथा उपग्रह होता. या उपग्रहामुळे शत्रूवर नजर ठेवणे आणि नैसर्गिक आपत्तीवेळी माहिती जमा करता येणे शक्य होणार आहे. रीसॅट-२बीचे वजन ३०० किलो असून त्याच्यासोबत सिंथेटिक अपर्चर रडार (सार) इमेजर प्रक्षेपित करण्यात आले आहे. रीसेट-२बी ५५५ किलोमीटर उंचीवर प्रस्थापित होईल.

 
 
 

पीएसएलवीचे हे ४८वे उड्डान असून रीसॅट सॅटेलाइट सीरीजमधील हा चौथा उपग्रह आहे. याचा वापर आपत्ती व्यवस्थापन, रडारसंबंधी कामांसाठी केला जाणार आहे. जमीनीवरील कोणत्याही इमारतीचा अथवा वस्तूचा दिवसभरात २ ते ३ वेळा फोटो सार रडार घेऊ शकते. यामुळे भारतीय लष्कराला पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कॅम्पवर नजर ठेवण्यास मदत होणार आहे. याशिवाय एलओसीवर होणाऱ्या घुसखोरीवर नजर ठेवता येणार आहे. यामुळे दहशतवाद्यांच्या कारवायांवर अंकुश ठेवता येईल. रिसेट- २ बीआर१ उपग्रह समुद्रात शत्रू देशाचे जहाज देखील शोधून काढू शकते. या उपग्रहाच्या माध्यमातून हिंदी महासागरात चीन आणि अरबी समुद्रात पाकिस्तानच्या जहाजांवर लक्ष ठेवता येईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@