घाबरू नका स्वतःवर विश्वास ठेवा; राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2019
Total Views |




नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीत एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित आघाडीला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त होत असल्याने विरोधीपक्षांमध्ये निराशेचा सुर आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उमेद जागृत करण्यासाठी राहुल गांधींनी बुधवारी ट्विट करत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. "खोट्या एक्झिट पोलच्या कलामुळे निराश होऊन जाऊ नका. तुमची मेहनत वाया जाणारी नाही. स्वतःच्या पक्षावर विश्वास ठेवा. पुढील २४ तास महत्वपूर्ण आहेत. सतर्क राहा, घाबरून जाऊ नका, तुम्ही सत्याच्यासाठी लढणारे आहात. तुमची मेहनत वाया जाणारी नाही, धन्यवाद... जय हिन्द !"

 

लोकसभा निवडणूकीतील विविध वृत्तवाहीन्यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये आलेल्या अंदाजात भाजपचे पारडे जड दिसत आहे. कॉंग्रेससह इतर पक्षांना एकत्र येऊनही बहुमताचा आकडा गाठता येत नाही, हा मतदार कौल देऊ शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने विरोधी पक्षांतील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीही एक्झिट पोलवर लक्ष देऊ नका, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. अफवांवर विश्वास ठेवू नका, तुम्हाचा विश्वास तोडण्यासाठीच हे केले जात आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळणार, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@