बीवी नंबर वन बनली मम्मी नंबर वन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2019
Total Views |


 

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून लोकप्रिय असलेली करिष्मा कपूर बीवी नंबर च्या अवतारानंतर आता मम्मी नंबर वन च्या अवतारात प्रेक्षकांना दिसणार आहे. अल्ट बालाजी निर्मित 'मेंटलहूड' नावाच्या वेब सिरीजमध्ये ती आईची भूमिका साकारणार आहे. या वेब सिरीजची पहिली झलक एकता कपूरने आज सोशल मीडियावर शेअर केली.

मुंबईतील ही आई मुलांच्या जगामध्ये अतिशय हरवून गेली आहे. आणि या लहान मुलांच्या सगळ्या नखऱ्यांवर, त्यांना योग्य त्या गोष्टी शिकवता शिकवता तिला घर देखील सांभाळायचे आहे. आता या दोन्हीचा ताळमेळ ती कसा घालेल हे आपल्याला वेब सिरीज पाहिल्यावरच कळेल. मेरा शर्मा असे तिच्या या वेब सिरींजमधील पत्राचे नाव आहे. 


आता हे 'मेंटलहूड' असे नाव ऐकल्यावरच खरे तर आपल्या लक्षात येईल कि मदरहूड ही काही सोपी गोष्ट नाही. सगळ्यांचे मन जपताना स्वतः भरडून जाणारी आणि वेड लागेपर्यंत सर्वांची काळजी घेणारी ही आई अशी आहे जी आपल्याला आपल्या घरी सुद्धा पाहायला मिळेल.



 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@