भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा वेगवान होईल : राकेश झुनझुनवाला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2019
Total Views |




नवी दिल्ली : भारतातील वॉरन बफेट या नावाने ओळखले जाणारे अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने पूर्ववत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच वर्षे बॅंकींग संकट, जीएसटी, नोटाबंदी आदी महत्वपूर्ण सुधारणांमुळे अर्थव्यवस्था पुन्हा गती पकडणार आहे. देशातील सर्वात मोठे गुंतवणूकदार अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी एका मुलाखतीत हा अंदाज व्यक्त केला आहे.

 

भारतीय अर्थव्यवस्था अधिक वेगाने सशक्त होणार

झुनझुनवाला यांच्यामते भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेत विकासदर ८ ते ९ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो आणि भविष्यात तो १० टक्क्यांपुढेही पोहोचू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक दशकात विकासदरात वाढ झालेली पाहायला मिळालेली आहे. २०२० ते २०३० या काळात विकासदर आपल्या सर्वाधिक स्थानी असेल, असेही ते म्हणाले.

 

भारतीय विकासदराच्या आकडेवारीबद्दल प्रश्न

भारतीय अर्थव्यवस्थेच्या आकडेवारीबद्दल आयएमएफतर्फे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये सांख्यिकीय मंत्रालयातर्फे जाहीर केलेल्या विकासदराच्या आकडेवारीबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही विकासदराबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.

 

भविष्यात विकासदर ९ टक्क्यांवर

झुनझुनवाला यांच्यामते पुढील वर्षात भारतातील सद्यस्थितीत होत असलेली सुधारणा कायम राहील्यास विकासदर हा ९ टक्क्यांवर पोहोचणार आहे. यापूर्वीही राकेश झुनझुनवाला यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@