VVPAT Counting : निवडणूक आयोगाने फेटाळली २२ विरोधीपक्षांची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2019
Total Views |



नवी दिल्ली :  विरोधी पक्षांनी मंगळवारी निवडणूक आयोगाकडे निवेदन VVPAT Counting बद्दल मागणी केली होती. चेन्नईतील टेक्नोक्रॅटस् ग्रुपने न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने बैठक घेत मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करत विरोधकांना धक्का दिला आहे. दरम्यान या प्रकारानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर पक्षकार्यकर्त्यांनी निदर्शने सुरू केली होती.


लोकसभेच्या मतमोजणीतील पारदर्शक प्रक्रियेसाठी मतपावत्यांची (व्हीव्हीपॅट) मतमोजणी सर्वात आधी केली जावी. त्यानंतरच उर्वरित यंत्रांमधील मतांची मोजणी व्हावी, अशी मागणी विरोधकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. यावर बुधवारी निर्णय घेतला जाईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेण्यात आला. व्हीव्हीपॅट आणि मतपेटीतील पन्नास टक्के मतांची पडताळणी केली जावी, त्यात तफावत आढळल्यास संबंधित विधानसभा मतदार संघातील व्हीव्हीपॅटची मोजणी करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती.

काँग्रेस नेते आणि वकील अभिषेक सिंघवी यांनी आयोगासमोर विरोधकांची बाजू मांडली. विरोधकांनी निवडणूक आयोगाने आमच्या मागण्यांचा विचार करु असे सांगितले असल्याची माहिती दिली होती. मात्र यावेळी निवडणूक आयोगाची देहबोली सकारात्मक नव्हती असेही विरोधकांनी म्हटले होते. भाजपाने मात्र विरोधक पराभवाच्या भीतीने हे सर्व करत असल्याचा टोला लगावला आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@