अखेर बीसीसीआय निवडणुकीची तारीख ठरली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : अडीच वर्षाच्या कालावधीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) निवडणुका २२ ऑक्टोबरला होणार आहेत. बीसीसीआयच्या त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीने हा निर्णय घेतला. ही प्रशासकीय समिती सर्वोच्च न्यायालयाने अडीच वर्षांपूर्वी नियुक्त केली होती. अखेर बीसीसीआयच्या निवडणुकीला मुहूर्त मिळाला. जगातील सगळ्या श्रीमंत मानल्या जाणाऱ्या क्रिकेट बोर्ड म्हणून बीसीसीआय ओळखले जाते.

 

बीसीसीआयचे सदस्य आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले वकील नरसिंहा यांच्यात झालेल्या चर्चेनंतर नरसिंहा यांनी आपला अहवाल न्यायालयात सादर केला. ३८पैकी ३१ राज्यांनी लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत. उरलेल्या संघटना आपल्या सदस्यांशी बोलून निर्णय घेणार आहेत. काही संघटनांनी नरसिंहा यांच्या भेटीनंतर वरिष्ठ परिषदेसाठी (अपेक्स कौन्सिल) ९ ऐवजी जादा सदस्यांची मागणी केली होती. ती नरसिंहा यांनी ही परिषद १९ सदस्यांची असावी ही मागणी मान्य केली. नरसिंहा यांनी या सगळ्या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका व्यवस्थित वठविली. त्यामुळे आता बीसीसीआयचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सांगितले की, "बीसीसीआयच्या सदस्यांनी लोढा समितीच्या शिफारशींचा स्वीकार केला ही समाधानाची बाब आहे. एकूणच बीसीसीआयचा कारभार पारदर्शक पद्धतीने आता चालेल." आता निवडणुका होईपर्यंत ही प्रशासकीय समिती बीसीसीआयच्या कारभारावर लक्ष ठेवेल.

 

असा असेल निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रम

 

- ३० जून : बीसीसीआयने निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती करणे. प्रशासकीय समितीच्या मदतीने या अधिकाऱ्याने निवडणुकीचा कार्यक्रम आखणे.

- १ जुलै : राज्य संघटनांनी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे.

- १४ ऑगस्ट : राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारांची यादी निश्चित करणे.

- १४ सप्टेंबर : राज्य संघटनांच्या निवडणुका पूर्ण करणे

- २३ सप्टेंबर : बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी राज्य संघटनेकडून प्रतिनिधी पाठविण्याची तारीख

- ३० सप्टेंबर : बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची यादी तयार करणे.

- २२ ऑक्टोबर : बीसीसीआयची निवडणूक.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@