पॅरीसमध्ये भारतीय राफेल कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : फ्रान्समध्ये भारताचे राफेल प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहीती उघड झाली आहे. ज्या भारतीय कार्यालयातून राफेलचे व्यवस्थापन केले जात होते. त्या कार्यालयात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


या कार्यालयात रविवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. राफेल करारासंदर्भातील महत्वाचे पुरावे चोरण्याच्या हेतूने ही घुसखोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या उपनगरात राफेल व्यवस्थापन तुकडीचे कार्यालय आहे. दरम्यान या सर्व प्रकारात राफेलचे कोणतेही पुरावे, दस्तावेज किंवा हार्ड डिस्क आदी माहीती चोरीला गेलेली नाही.
 

अज्ञात इसम कार्यालयात नेमके कोणत्या उद्देशान घुसण्याचा प्रयत्न करत होते, याचा तपास सुरू असल्याचे भारतीय हवाईदलातील सूत्रांनी सांगितले. ग्रुप कॅप्टन रँकच्या एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली राफेल प्रोजेक्ट व्यवस्थापन तुकडी येथे कार्यरत असून ३६ राफेल विमानांच्या निर्मितीच्या अनुशंगाने ठेवावा लागणारा समन्वय तसेच भारतीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण या बाबी हे कार्यालय हाताळते.

 

सेंट क्लाउड शहरातील कॉम्प्लेक्समध्ये हे कार्यालय असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी करण्यात आली. या कार्यालयात मोठी रोख रक्कम वा मौल्यवान वस्तू नसल्याने दस्तावेज चोरीच्या उद्देशाने हा प्रकार घडला असण्याची शक्यता अधिक बळावली आहे.  भारतीय हवाईदलाने याबाबत संरक्षण मंत्रालयाला विस्तृत माहिती दिली असून या प्रकारामुळे खळबळ माजली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@