आणि अखेर अमेय ला गर्लफ्रेन्ड मिळाली ??

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2019
Total Views |


 

फास्टर फेणे फेम अमेय वाघच्या आगामी चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. अमेय गर्लफ्रेंड पटवणाराच असे ठामपणे म्हणत असताना त्याला गर्लफ्रेंड मिळली का याविषयी कुतूहल व्यक्त करणाऱ्या पोस्ट अत्तापर्यंत अनेक कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावरून शेअर केल्या आणि त्यांना अमेय वाघने एका वेगळ्याच अंदाजात उत्तर देखील दिले. मात्र आता अखेर त्याला गर्लफ्रेंड मिळाली असल्याचे त्याने जाहीर केले आहे.

त्यामुळे आता अखेर नचिकेतला त्याची अलिशा मिळाली अशी पोस्ट त्याने नुकतीच शेअर केली. आता ही अलिशा दुसरी तिसरी कोणी नसून सई ताम्हणकर आहे. त्यामुळे अलिशाने म्हणजेच सई ताम्हणकरने देखील 'मीच ती' असे म्हणत चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. आणि सर्वांना पडलेल्या कुतूहलाचा खुलासा केला आहे.  


 

आता या चित्रपटातील उर्वरित कलाकार देखील हळूहळू आपल्या समोर येतील. त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना असणार आहे. नचिकेताला त्याची अलिशा कशी? कुठे? आणि कधी मिळाली? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.गर्लफ्रेंडया चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे. चित्रपटाला हृषीकेश, सौरभ, जसराज यांचे संगीत लाभले असून क्षितीज पटवर्धन यांची गीते आहेत. अमेय आणि सई अशी हटके जोडी असलेला उपेंद्र सिधये दिग्दर्शित गर्लफ्रेंडहा चित्रपट येत्या २६ जुलै २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@