मोस्ट अवेटेड 'साहो' मधील प्रभासचे पोस्टर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2019
Total Views |



 
बाहुबलीच्या भरघोस यशानंतर 'साहो' या रोमांचक चित्रपटासाठी लोकप्रिय अभिनेता प्रभास सज्ज झाला आहे. 'साहो' या त्याच्या आणखी एका बिग बजेट चित्रपटाचे नवे पोस्टर त्याने त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमधून साय-फाय शैलीतील त्याची भूमिका उघड होत असून चेहऱ्यावरील गंभीर भाव प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढवतील.

 

साहो चित्रपटात कार्स आणि बाईकवरून पाठलाग करतानाची लढाई असे अनेक ऍक्शन सीन्स सुद्धा असणार आहेत. तसेच ही एक साय-फाय फिल्म असल्यामुळे यामध्ये नेमका काय प्रयोग होणार आहे? याची उत्सुकता देखील प्रत्येकाला असणार आहे.

'साहो' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुजित यांनी केले असून या चित्रपटात प्रभास बरोबरच श्रद्धा कपूर, निल नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, अरुण विजय अशा जबदस्त स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट हिंदी बरोबरच तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार असून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्टला हा चित्रपट देशभर प्रदर्शित होणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@