जो ओळखी अंतर्मनाला, तोचि जाणे स्वत:ला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2019
Total Views |

 

'स्व-संकल्पनावा स्व-जाणीवही खरेतर खूप ज्ञानदायी व आत्मनिरीक्षणाला प्रोत्साहित करणारी बोधकल्पना आहे. मुख्यत्वेकरून या अफाट, अमर्याद जगात सगळेच कसे गोंधळलेले, गडबडलेले व धुसर भासते, तेव्हा स्व-जाणीवबहुमोल वाटते.

 

आपण क्षणाक्षणाला लहानसहान गोष्टी करत असतो, त्यासुद्धा आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग असतात. काही माणसाच्या आयुष्याचा आकार बनतात, तर काही त्याला निराकारी समजतात. पण, आपल्या अस्तित्वाची जाणीव मात्र सदैव आपल्या आकलनशक्तीचा घटक आहे, हे निश्चित. तरीही स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव समजून घ्यायची किंवा आपल्या विचारांतून, भावनेतून वा अनुभवांतून तिचा बोध घ्यायचा म्हटले, तर तो सर्वसाधारण प्रत्यय नाही. आपल्याच अंतर्मनातला हा बोध घ्यायचा म्हटले, तर तो सर्वसाधारण प्रत्यय नाही. आपल्याच अंतर्मनातला हा बोध नक्की कसा असेल हे समजणे किंवा हा अंश आपल्याला कसा व्यक्त करता येईल, हा विचार खरंच शब्दातीत आहे. स्व-जाणिवेचे वर्णन हे देवाच्या वर्णनासारखे असावे. कदाचित देव खरा असा कोणी पाहिलेलाच नाही. पण, त्याची अनेक रुपे इहलोकीच्या पामरांनी मूर्त रुपात वर्णिली आहेत आणि जगभर ती वसली आहेत. अनंतकाळापासून आपण भाव तसा देवहे गुणवैशिष्ट्यपूर्ण आणि तरीही भक्तिरसाने सुशोभित झालेले सगळ्यांच्या आवडीचे विधान ऐकलेले आहे. एक भक्त आपल्या मनीचा परमेश्वर जसजसा रेखाटायला लागतो, तसतसा दुसरा भक्त त्याला समजलेले परमेश्वराचे ते रूप आपल्या मनी वसवू लागतो. मनीचे ते देवरूप शेवटी मूर्ती होऊन मूर्तरूपात इहलोकी प्रतिष्ठापित होते. हीच मूर्ती भक्त पूजतात, त्याला आळवतात, भजतात. त्यासाठी विविध पूजाविधी व उपचार करतात. स्व-संकल्पनाकिंवा स्व-जाणीवतशीच आहे. तुम्हाला स्वत:च्या भावनांबद्दल, अंतर्मनाच्या विचारांबद्दल, जगण्याच्या मूल्यांबद्दल, स्वतःच्या नैतिकतेबद्दल जितकी प्रामाणिक व खरी जाणीव होते, तितकी तुमच्या मनात स्व-जाणिवेची बौद्धिक संकल्पना निर्माण होते. हा स्व-जाणिवेचा व्यक्त बोध आपल्याला स्वतःजवळ घेऊन स्वतःची ओळख करून देतो. स्वतःचीओळख होत जाते, तेव्हा माणसाला खर्‍या अर्थाने दुसर्‍याची ओळखही होऊ लागते. दुसर्‍याला काटेकोरपणे ओळखता येणे, ही खरतर कला आहे. दुसर्‍यांच्या मनात असलेले भाव कृत्रिम आहेत का अकृृत्रिम आहेत, त्या व्यक्तींच्या मनात आपल्याविषयी प्रेम आहे का द्वेष आहे, एखादी व्यक्ती आपले भले चिंतीत आहे का की तिच्या मनात आपल्याबद्दल तिरस्कार आहे, अशा अनेक गोष्टी स्वतःबद्दल पारदर्शक आणि मोकळी जाणीव असलेल्या व्यक्तीला सहज कळायला लागतात. या व्यक्ती कोणी जादूगार आहेत का? दुसर्‍यांच्या मनातले त्यांना कसे वाचता येते इ. प्रश्न आपल्या मनात उभे राहतात, पण ते तसे नसून या व्यक्ती स्वतःबद्दल प्रामाणिक व दृढ भान असणार्‍या सुज्ञ व्यक्ती आहेत. या व्यक्तींना स्वतःविषयी पूर्ण जाणीव आहे, आपल्या अंतर्मनातील विविध पैलूंना त्या प्रामाणिकपणे ओळखतात, त्यांनी स्वतःला अंतर्यामीसमजून घेतले आहे. आपल्यातलेच आनंदी मन, दुःखीमन, भित्रे मन, आशावादी मन, दुबळे मन वा खंबीर मन असे अनेकविध मनाचे रंग त्यांनी स्व-जाणिवेतून यथोचितपणे समजावून घेतले आहेेत. मनाचे हे भिन्न तरंग जेव्हा केव्हा त्यांना जाणवू लागतात, तेव्हा कोणत्याही त्रासाशिवाय त्या व्यक्ती त्या तरंगाची उपस्थिती स्वीकारतात. त्या तरंगांना त्या नाकारत नाहीत. त्या तरंगांशी त्या प्रामाणिक राहतात, अशा व्यक्तींना जो अनुभव त्या क्षणी येतो, तेव्हा त्यापेक्षा वेगळा अनुभव यायला हवा होता, असा हव्यास त्यांच्या मनात येत नाही. एखाद्या वाईट, त्रासदायक घटनेने मनाला अतीव क्लेश होणारच आहे, हे प्रामाणिक सत्य या मंडळींनी सहज स्वीकारलेले असते. म्हणूनच की काय, त्याच्या जगण्यात एक नैसर्गिक सहजता वा बाळबोधपणा असतो. आपल्या अकृत्रिम व निष्पाप भावनांशी स्वाभाविक पारदर्शी नाते जोडणारी ही मंडळी सुज्ञ आणि प्रभावी असतात.

स्व-जाणिवेच्या अनुभवाने परिपक्व झालेले त्यांचे मन कधी खूप हट्ट करणार्‍या खोडकर मुलासारखे जसे असते, तसेच त्यांचे हट्ट कसे चुकीचे आहेत, हे मायेने समजविणार्‍या आईसारखेही असते. स्व-जाणिवेतून विकसित होणारे मन आपल्याच गणगोतांवर शस्त्र उगारून युद्ध करणार नाही, असे महाभारतातील अर्जुनासारखे जसे असते, तसेच फळाची इच्छा न करता स्वत:चे काम करीत राहाअसे सांगणार्‍या श्रीकृष्णासारखेही असते. स्व-जाणीवस्वत:ची स्वत:लाही ओळख करून देते, ती अत्यंत बहुमोल अशासाठी आहे की, त्यामुळेच माणसालास्वत:ला माणूसम्हणून समजून घेता येते. एक सर्वसामान्य जीव म्हणून आपण या जगात आयुष्य व्यतीत करतो, तेव्हा स्वत:च्या मनावर प्रभुत्व मिळविता येते, ते स्व-जाणिवेतूनच. स्वत:साठी स्वत:चा विकास करायला हवा, तो आपला मानवी हक्क आहेच, पण आपल्याबरोबरीने इतरांना विकास व आपल्या समाजाचा विकासही आपण करू शकतो. हळूहळू माणूसम्हणून स्वत:ला जसे समजायला शिकू, तसेच इतरांनाही समजून घ्यायला शकू. विकास हा फक्त एकट्यासाठी नसतो, तो विश्वासाठीसुद्धा असतो, हे समजणार्‍या व्यक्तींसाठी जीवन त्यांना कळले होहे विनयाने म्हणता येईल.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@