'वन डे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2019
Total Views |



न्याय मिळाल्याशिवाय धैर्याची किंमत नसते अशा आशयाचा 'वन डे' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. वन डे या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर एका निवृत्त न्यायाधीशांची भूमिका साकारणार आहेत. आपल्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या न्यायालयीन प्रकरणांना सोडवण्यात यशस्वी झालेला वकील; मात्र निवृत्त होण्याच्या बरोबर एक दिवस आधी त्यांना असे लक्षात येते की त्याच्या चुकीमुळे काही निरपराध आरोपींना शिक्षा भोगावी लागली या गोष्टीची खंत त्यांना सतावत आहे त्यामुळे या निरपराध लोकांना न्याय देण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.

 

अनुपम खेर यांच्याबरोबरच इशा गुप्ता आणि कुमुद मिश्रा हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अशोक नंदा दिग्दर्शित 'वन डे' हा चित्रपट येत्या १४ जून ला प्रदर्शित होणार आहे. इशा गुप्ता एका पोलीस कर्मचाऱ्याच्या भूमिकेत आपल्याला दिसणार असून एका खुनाची रहस्यमय कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अनुपम खेर यांच्यासारख्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाच्या अभिनयाबद्दल तर आपण न बोलणेच योग्य ठरेल मात्र इशा गुप्ता देखील पहिल्यांदाच अशाप्रकारची भूमिका साकारताना दिसणार आहे त्यामुळे अखेरीस या चित्रपटातील निरपराध आरोपींना न्याय कसा मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@