अरबाज खानचे मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2019
Total Views |



दबंग सीरिजच्या अभूतपूर्व यशानंतर प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता अरबाज खान आता मल्याळम चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. 'बिग ब्रदर' असे त्याच्या आगामी मल्याळम चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात तो एका आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असून यामध्ये मल्याळम चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता मोहनलाल यांच्यासह तो आपले पदार्पण करणार आहे.

या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या जुलै महिन्यात सुरुवात होणार असून या चित्रपटाविषयीची घोषणा आज मोहनला आणि अरबाज खान या दोघांनीही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. 'बिग ब्रदर' या चित्रपटाचे दिग्दर्शन 'बॉडीगार्ड' चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्दीकी हे करणार आहेत.

 
 

अरबाज खान सध्या दबंग ३ च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असला तरी तो या चित्रपटामध्ये एक महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.दबंग ३ चित्रपटात देखील अरबाज खान 'मख्खी' या पत्रामध्ये आपल्याला दिसणार असून दबंगमधील लोकप्रिय पात्र असलेल्या चूलबुल पांडेच्या अर्थातच सलमान खानच्या सावत्र भावाची भूमिका तो साकारणार आहे. ऑफस्क्रीन तर सलमान आणि अरबाज खानची केमेस्ट्री आपण पहिलीच आहे मात्र आता मोठ्या पडद्यावर देखील त्या दोघांमधील भावा-भावांचे प्रेम आपल्याला पाहायला मिळणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@