अभय देओलच्या या चित्रपटाचे कान महोत्सवात अनावरण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2019
Total Views |


अभय देओल हा सध्या
'चॉपस्टिक्स' या वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात पदार्पण करत असल्यामुळे चर्चेत आहे. अशातच सध्या सुरु असलेल्या जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात त्याच्या 'जंगल क्राय' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आणि पहिले वहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक नक्की प्रभावित होणार आहेत.

'जंगल क्राय' हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित असून रग्बी या खेळाचे प्रशिक्षक रुद्राक्ष जेना यांच्या जीवनपटावर बेतलेला आहे. या चित्रपटात अभय देओल रुद्राक्ष जेना यांची भूमिका साकारणार आहे. तर एमिली शाह हे देखील या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत.

ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की रुद्राक्ष हे एका रग्बी अकादमीचे प्रशिक्षक आहेत. या प्रशिक्षकाने ओडिसामधील एका छोट्याशा गावातील मुलांना घेऊन लंडनमधील प्रसिद्ध रग्बी स्पर्धेत सहभागी होण्याचा विडा उचलला आहे. या मुलांना रग्बी या खेळाविषयी काहीच माहिती नसताना देखील त्यांना प्रशिक्षण देण्याचा संघर्ष या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यातच स्टुअर्ट राईट हे हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते एमबीई पॉल वोश यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@