'दे दे प्यार दे' मधील 'चले आना' गाणे प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2019
Total Views |



अजय देवगण आणि तब्बू यांच्यावर चित्रित करण्यात आलेले "चले आना" हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. अकीव अली दिग्दर्शक म्ह्णून पदार्पण करत असलेल्या 'दे दे प्यार दे या चित्रपटातील हे गाणे अमाल मलिक यांनी संगीतबद्ध केले आहे तर त्याचा भाऊ अरमान मलिक याने हे गेले आहे. या गाण्याचे शब्द कुणाल वर्मा यांनी लिहिले आहेत. या गाण्याला आत्तापर्यंत ३ लाख ५ हजार ६५६ व्युज मिळाले आहेत. चित्रपटातील बाकी गाण्यांचा विचार करता अनेक नवीन लोकांना संधी देण्यात आली आहे.


 

सुरुवातीला हा चित्रपट १५ मार्च ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता मात्र अजय देवगणचाच टोटल धमाल देखील तेव्हाच प्रदर्शित हॊणार असल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट येत्या १७ मे ला देशभर प्रदर्शित होणार आहे. लव राजन, तरुण जैन आणि सुरभी भटनागर यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून बिनोद प्रधान यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे.


 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@