कुली नंबर १ या दिवशी प्रदर्शित होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2019
Total Views |

 

कुली नंबर १, कॉमिक टायमिंग आणि चार्म पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे वरुण धवन आणि सारा अली खान. अखेर २०२० च्या १ मे ला कुली नंबर १ चा रिमेक प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्हिड धवन, वरुण धवनचे वडील म्हणून भूमिका साकारणार आहे.

 

 

सुई धागा आणि कलंक मधील थोडीशी गंभीर भूमिका देखील तितक्याच ताकदीने पेलल्यानंतर आता पुन्हा एकदा वरुण धवन आपला डावा हात असलेल्या कॉमेडी जॉनर असलेल्या चित्रपटात काम करणार आहे. 'मै तेरा हिरो' आणि 'जुडवा २' नंतर त्याचा आपल्या वडिलांबरोबर हा तिसरा चित्रपट आहे.

कुली नंबर १ हा रिमेक नसून जुन्या चित्रपटातील भावार्थ घेऊन बनवलेला चित्रपट असेल असे वरुण धवन याने म्हटले आहे. त्यामुळे हा चित्रपट फक्त अनुकूलन आहे असे चित्रपटकर्त्यांचे म्हणणे आहे. आता हा रिमेक आहे की फक्त अनुकूलन आहे हे प्रेक्षक ठरवतीलच. परंतु त्या आधी वरुण धवनने या चित्रपटाचे एक पोस्टर नुकतेच शेअर केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@