बदलापूर नगरपालिकेवर युतीचा झेंडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2019
Total Views |


 

 

नगराध्यक्षपदी शिवसेनेचे प्रियेश जाधव उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या राजश्री घोरपडे

 

बदलापूर : बदलापूरच्या नगराध्यक्षपद आणि उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून नगराध्यक्षपदी शिवसेनेचे अँड. प्रियेश जाधव तर उप नगराध्यक्षपदी भाजपाच्या राजश्री घोरपडे यांची बिनविरोध निवड झाली.

 

शिवसनेच्या विजया राऊत यांनी पक्षांतर्गत झालेल्या करारानुसार १ मार्च रोजी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी उप विभागीय अधिकारी जगदसिंग गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेच्या सभागृहात आज निवडणूक पार पडली. नगराध्यक्ष पदासाठी अँड. प्रियेश जाधव आणि सानिका ढमढेरे या शिवसेनेच्या दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. मात्र सानिका ढमढेरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अँड. जाधव यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांची नगराध्यक्षपदी निवड झाली.

 

नगराध्यक्षपदाची निवड होताच उपनगराध्यक्ष पदासाठी निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या राजश्री घोरपडे यांचा एकच उमेदवारी अर्ज सादर झाल्याने त्यांची देखील बिनविरोध निवड झाल्याचे गिरासे यांनी जाहीर केले. नगरपालिकेत ४७ नगरसेवक असून शिवसेना २४ आणि भाजपाचे २० तर राष्ट्रवादी दोन आणि अपक्ष एक असे संख्याबळ आहे. पुढील वर्षी मे महिन्यात नगरपालिकेचा पाच वर्षांचा कालावधी संपणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@