सुलभाताई देशपांडे नाट्य पुरस्कारासाठी आर्थिक आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2019
Total Views |

 


मुंबई :
स्वर्गीय जेष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (दादर) संस्था व सुलभाताई यांच्या परिवारातर्फे नवोदित कलावंतांसाठी
सुलभाताई देशपांडे नाट्य पुरस्काराचे" आयोजन करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील, सामाजिक दानशूर व्यक्तींनी व संस्थांनी अधिकाधिक रक्कम पुरस्कारासाठी देणगी स्वरूपात द्यावी असे आवाहन मराठी ग्रंथ संग्रहालय (दादर) यांनी केले आहे. सत्कारमूर्तीस २५ हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


सुलभा देशपांडे यांनी मराठी व हिंदी चित्रपटातुन प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यांच्या कार्यकाळात त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित केले होते. मराठी व हिंदी चित्रपटातील त्यांच्या अभिनयामुळे अजूनही प्रेक्षकांच्या मनात त्या घर करून आहेत.
या पुरस्काराकरिता निधीसंकलनाचे काम दादर विभागातर्फे होणार आहे. देणगीदारास ८० जी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हा निधी धनादेश किंवा डी.डी स्वरूपात मुंबई मराठी ग्रंथसंग्रालय- दादर विभाग या नावाने स्विकारला जाईल.


रक्कम पाठविताना सोबत आपले संपूर्ण नाव, पत्ता, ई-मेल, दूरध्वनी क्रमांक नमूद करावा जेणे करून देणगी दिलेल्या रकमेची पावती पाठविणे सोपे जाईल, तसेच ही देणगी सुलभाताई देशपांडे नाट्य पुरस्कारासाठीच वापरावी असे नमूद करावे,  अधिक माहितीसाठी ९८१९६०११०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@