कारगिल युद्ध पुन्हा डोळ्यासमोर उभे करणार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2019
Total Views |


 

कारगिलचे युद्ध म्हटले की अजूनही आपल्या अंगावर काटा येतो. चित्तथरारक असे हे युद्ध आणि त्यात हौतात्म्य प्राप्त झालेले आपले जवान यांनी आपल्या देशासाठी प्राणांची आहुती दिली होती. याच युद्धात शाहिद झालेल्या विक्रम बत्रा या शूर जवानावर आधारित "शेरशाह" चित्रपट धर्मा प्रोडक्शन घेऊन येत आहे. विष्णू वर्धन दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी मुख्य भूमिका साकारणार आहेत.



 

'शेरशाह' या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरु होईल अशी घोषणा करणारी पोस्ट आज चित्रपटकर्त्यांनी शेअर केली आहे. भारतीय सेनेशी निगडित चित्रपटांचा विचार करता दिवार, बॉर्डर, लक्ष्य, टॅंगो चार्ली याबरोबरच नुकताच प्रदर्शित होऊन गेलेला उरी या चित्रपटांची उदाहरणे आपल्या समोर आहेतच. आता या सर्व चित्रपटांप्रमाणेच 'शेरशाह' या चित्रपटामध्ये काय असेल याची उत्सुकता आता वाढली असेलच.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@